घरताज्या घडामोडीकेसात गजरा,हातात चुडा! थाटात पार पडला Vicky-Katrinaचा विवाह सोहळा,पहा फोटो

केसात गजरा,हातात चुडा! थाटात पार पडला Vicky-Katrinaचा विवाह सोहळा,पहा फोटो

Subscribe

विक्की कतरिनाच्या ग्रँड वेडिंगची पहिली झलक या व्हिडिओमधून समोर

विक्की कतरिनाच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली. बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये पार पडला. राजस्थानच्या सिक्स सेन्स हॉटेलमध्ये दोघांचा राजेशाही थाटात विवाह पार पडला. दोघांचे कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या उपस्थित दोघांचा लग्नसोहळ्याला उपस्थित होते. विक्की आणि कतरिनाने लग्नात प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तरिही दोघांच्या लग्नाचे काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

- Advertisement -

 

- Advertisement -
View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

कटरिना लग्न विधीसाठी जात असतानाचे तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. कतरिनाने डार्क पिंक कलरचा सुंदर लेहंगा घातलाय. केसात भरपूर गजरे माळलेत, हातात चुडा भरलाय,नाकात नथ,कपाळावर मांग टिका असा साज शृंगार करत कतरिना बोहल्यावर चढली. नवरा नवरी झालेल्या कतरिना आणि विक्की कौशलच जोरदार आतिशबाजीत स्वागत करण्यात आलं. लग्नात विक्कीने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी घातलीय. ज्यात विक्की फारच हँडसम दिसत आहे.

राजस्थानमध्ये रंगला भव्य शाही विवाह सोहळा

विक्की आणि कतरिनाने राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या सिक्स सेंसेस फोर्ट बरवाडा येथे शाही विवाह सोहळा आयोजित केला होता. गेली अनेक दिवस दोघांच्या लग्नासाठी फोर्टवर जय्यत तयारी सुरू होती. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कतरिना विक्की राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावर उभे असून एकमेकांच्या गळ्यात हात घातलाना दिसत आहेत. मागचे काही दिवस सुरू असलेल्या ग्रँड वेडिंगची पहिली झलक या व्हिडिओमधून समोर आली आहे.

लग्नाचे फोटो मॅग्जीनला विकणार

विक्की कौशल आणि कतरिना यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी फॅन्स खूप आतूर आहेत मात्र त्यांनी लग्नाचे फोटो पाहण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. कतरिना आणि विक्की कौशल त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल मॅग्जीनला विकणार आहेत. तसचं दोघांनी लग्नाला आलेल्या पाहुण्यांना फोन वापरण्यास मनाई केली आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर न करण्याची हमी देखील त्यांच्याकडून घेतली आहे.


हेही वाचा – Katrina-vicky Kaushal Wedding: लग्नाचा ७५ टक्के खर्च कतरिनाच्या डोक्यावर, एकटीच घेतेय सगळे निर्णय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -