घरमनोरंजन'लवकरच करेन साखरपुडा', म्हणत कतरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलने केले शिक्कामोर्तब

‘लवकरच करेन साखरपुडा’, म्हणत कतरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलने केले शिक्कामोर्तब

Subscribe

अभिनेता विकी कौशल ‘उरी’ चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहचला आहे. अशातच विकी कौशलचा बहुचर्चित सरदार उधम सिंह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मात्र सोशल मीडियावर चित्रपटाशिवाय विकी कौशल आणि कतरिनाची जोडी चांगलीच गाजताना दिसतेय. अशातच गेल्य़ा काही दिवसांपासून कतरिना कैफ आणि विकीच्या रिलेशनशीपविषयी चाहत्यामध्ये चर्चा रंगू लागल्यात. मात्र या चर्चांवर आता विकी कौशलने शिक्कामोर्तब केला आहे.

विकी आणि कतरिना अनेकादा एकत्र स्पॉट करण्यात आले. सरदार उधमच्या स्क्रीनिंग वेळीदेखील ही जोडी चाहत्यांना एकत्र झळकल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाही तर अनेकदा कतरिनाच्या घराबाहेर विकीला स्पॉट करण्यात आलेल. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी शिजतयं अशा चर्चा रंगू लागल्या. अशातचं ही जोडी लवकरचं लग्न करणार असल्याचे म्हटले जातेय, मात्र या चर्चांवर आता विकी कौशलने पूर्णविराम दिला आहे. एका मुलाखतीत बोलताना विकी कौशल म्हणाला की, “अशा प्रकारच्या बातम्या तुमचीच मित्रमंडळी पसरवतायत. परंतु योग्य वेळ आल्यानंतर मी नक्की साखरपुडा करेन आणि ती वेळ लवकरच येईल”, असं विकीने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, साखपुड्याची वेळ लवकरच येईल असं म्हणणाऱ्या विकीने नेमका कोणासोबत साखरपुडा करणार हे अद्याप स्पष्ट केलं नाही. त्यामुळे विकी कौशल नेमकं कोणाच्या गळ्यात वधू माळ घालणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. ऑगस्टमध्ये विकी आणि कतरिनाने साखरपुडा केल्याची चर्चा रंगली होती. परंतु, यावर कतरिना किंवा विकीने कोणताही माहिती दिली नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -