घरताज्या घडामोडीविराट-अनुष्काने घेतला एक दिवसाचा क्लास, पण शिकवलं काय?

विराट-अनुष्काने घेतला एक दिवसाचा क्लास, पण शिकवलं काय?

Subscribe

‘अॅन अॅकादमी ऑन द लिजेंड्स’च्या दुसऱ्या भागातील लाईव्ह क्लासमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल सहभागी झाले होते. विराट आणि अनुष्का या अनअॅकॅडेमी या ऑनलाइन लर्गिंन प्लॅटफॉर्मद्वारे एक दिवसासाठी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. त्यांनी ऑनलाईन असलेल्या विद्यार्थ्यांशी जीवनातले धडे, अनुभव, लाईव्ह प्रश्नोत्तर असं सगळं त्यांनी ५० हजारहून अधिक विद्यार्थ्यांशी घर बसल्या शेअर केलं.

लाईव्हच्या सुरुवातील त्यांनी सध्या परिस्थितीबद्दल खूप काही बोलले. त्यानंतर त्यांनी यशाबद्दल सांगितलं. विराट आणि अनुष्काने सुरुवातीपासूनचा प्रवास यावेळी विद्यार्थ्यांशी शेअर केला. आयुष्यातील बऱ्याच अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तसंच कोणालाही माहिती नसलेल्या गोष्टींचाही त्यांनी लाईव्हमध्ये खुलासा केला. तसंच आतापर्यंत अनेक समोर आलेली आव्हाने एकत्र जोडीने कशी पेलली आहेत याबद्दल पण सांंगितलं.

- Advertisement -

विराटने एका रात्री तो पूर्णवेळ का रडत होतो याबद्दलची आठवण त्याने सांगितली. तो म्हणाला की, मी जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा मला दिल्लीच्या संघात निवडण्यात आले नव्हते. त्यावेळी मी पूर्णपणे हतबल झालो होतो. माझ्या मनासारखी कोणतीच गोष्ट होत नव्हती. मी त्या रात्री पूर्णवेळ रडत होतो. मला संघात का निवडलं नाही याबद्दल मी माझ्या प्रशिक्षकांना देखील विचारलं.

यावेळीस अनुष्काबद्दल बोलताना विराट म्हणाला की, जेव्हापासून अनुष्का पत्नीच्या रुपात आली तेव्हापासून आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. तिच्याकडून शांत राहणं आणि संयम राखणं शिकलो. यापूर्वी मी फार उतावीळ होतो. पण ती संपर्कात आल्यामुळे मी संयम बाळगण्यास शिकलो. एकमेकांना जाणून घेतल्यानंतर दोघेही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो. मला तिच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. अनुष्काने देखील त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत कोरोनाचे १ हजार ७३८ बळी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -