घरमनोरंजननवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात पत्नीची पोलिसांत तक्रार; लावले हे गंभीर आरोप

नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात पत्नीची पोलिसांत तक्रार; लावले हे गंभीर आरोप

Subscribe

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर त्याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने गंभीर आरोप लावले आहेत. आलियाने यापूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत त्याच्या कुटुंबावरही गंभीर आरोप केले होते. मात्र आता तिने थेट नवाजविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात आलियाने लेखी तक्रार नोंदवली असून त्यामुळे नवाजच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

भारतीय दंड संहिता कलम ३७५, ३७६ (के), ३७६ (एन), ४२० आणि ४९३ अंतर्गत आलियाने तक्रार नोंदवल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यातच नवाज आणि त्याच्या कुटुंबातील अन्य चार सदस्यांविरोधात नोंदवलेल्या तक्रारीसंदर्भात आलिया सिद्दिकीने मुझफ्फरनगरमधील बुढाना पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला होता. दरम्यान,  लॉकडाऊन झाल्यापासून नवाज आपल्या आईसह उत्तर प्रदेशातील मूळ गावी राहत आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने म्हटले होते की, लग्नानंतर वर्षभरातच माझ्या आणि नवाजच्या नात्यात ताणतणाव आले. तेव्हापासून मी सर्व काही संयमाने हाताळत होते. पण आता सहन करणे कठीण झाल्याने मी हे पाऊल उचलले आहे. नवाज आणि आलिया यांना दोन अपत्ये असून त्यांच्या कस्टडीची मागणी आलियाने केली आहे.

हेही वाचा –

भाजपचे आऊटडेटेड नेते निलेश राणेंनी शुद्धीत बोलावे, विनायक राऊतांचा पलटवार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -