घरमनोरंजन'केसरी नंदन' मालिकेच्या माध्यमातून कुस्तीचे महत्व

‘केसरी नंदन’ मालिकेच्या माध्यमातून कुस्तीचे महत्व

Subscribe

कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. पुढे तो संपूर्ण भारतभर पसरला. पण जनमाणसात या खेळाविषयी जो प्रसार आणि प्रचार व्हायला हवा होता तो झालेला नाही. ‘सुलतान’च्या निमित्ताने सलमान खान, ‘दंगल’च्या निमित्ताने आमीर खान प्रत्यक्ष कथेत कुस्ती खेळताना, बाजी मारताना दिसलेले आहेत. भारतातल्या या खेळाचे जागतिक पातळीवर स्थान काय आहे हे उलगडून सांगणारे हे चित्रपट होते आणि आता ‘केसरी नंदन’ या मालिकेच्या माध्यमातून कुस्तीचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. हिंदी कलर्स वाहिनीवर लवकरच ही मालिका प्रसारित होणार आहे.

कृष्ण-धवल युगामध्ये जे मराठी चित्रपट येत होते त्यांचा साचा हा ठरलेला असायचा. त्यात कुस्ती हमखास दाखवली जात होती. अलिकडे त्याचे दर्शन फारसे घडत नाही. पण मराठी मालिकेच्या निमित्ताने कुस्ती ही दाखवली गेलेली आहे. तृप्ती भोईर हिच्या लेखन, दिग्दर्शनात नुकताच ‘अगडबम-2’ चित्रपट येऊन गेला. त्यात वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठीस स्वत: नायिका कुस्ती खेळण्यासाठी सज्ज होते. लवकरच हिंदीमधे येणार्‍या ‘केसरी नंदन’ या मालिकेमध्ये स्वत: वडीलच मुलाने कुस्तीत प्रावीण्य दाखवावे अशी इच्छा बाळगुण आहेत. त्याची ही कथा आहे. वडिलांबरोबर घरातल्या सदस्यांनाही तसेच वाटत असते. या निमित्ताने आईने मुलासाठी केलेला त्याग आणि भावासाठी बहिणीने घेतलेले कष्ट मुलाच्या यशाला कारणीभूत ठरतात. आस्ताद चौधरी, चाहत तेवानी, मानव गोहिल यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -