घरफिचर्सअभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

Subscribe

अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी चिपळूण येथे झाला आणि तिथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

डॉ. काशिनाथ घाणेकर हे मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९80 या काळातले ते मराठीतले पहिले सुपरस्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशिनाथांच्या पहिल्या पत्नी होत. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशिनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री सुलोचनाबाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक सहजीवनावर ‘नाथ हा माझा’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी चिपळूण येथे झाला आणि तिथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

आपल्याच नजरेत आपले आदरयुक्त व्यक्तित्व उभारण्याच्या अट्टाहासापोटी आयुष्याच्या शेवटपर्यंत झगडणारे, वैद्यकीय व्यवसायाद्वारे समाजात इज्जत मिळवून सत्कारयुक्त जीवन जगण्याऐवजी रंगमंचावर आपले श्वास शोधणारे, मराठी रंगभूमीवरचा सुपरस्टार होऊनही वडिलांच्या कौतुकाच्या शब्दासाठी पात्र न ठरणारे आणि ते दु:ख आयुष्यभर कवटाळून रंगमंचावर अवतरल्यानंतर मिळणार्‍या टाळ्या आणि शिट्ट्यांच्या धुंदीत आपले आयुष्यच उधळून लावणारे, असे त्यांच्या व्यक्तित्वाचे धागे भल्याबुर्‍या व कुरुपतेच्या सर्व रंगांसह विणले गेले. डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी आपल्या आयुष्याची क्षणभंगुरता आपल्या परीने याच निरर्थक हातवारे आणि तुर्रेबाजीने आपल्या परीने अर्थपूर्ण बनवली. त्यांचे अस्तित्व त्या रंगभूमीवर वावरण्याभोवती होते आणि त्यांचे प्राण समोरच्या गर्दीत होते.

- Advertisement -

सन १९६० ते १९८० या कालावधीत काशिनाथ हे मराठी नाट्य-चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्याकाळात ते सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होते. दादी माँ या १९६६ साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला.

सन १९६८ मध्ये निघालेल्या ‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठे अभिनेते बनले. नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशिनाथ घाणेकर यांना. ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती. त्यांच्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले, अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती.

- Advertisement -

‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. ‘एकटी’,‘झेप’,‘देवमाणूस’,‘पाठलाग’,‘मधुचंद्र’,‘सुखाची सावली’,‘मानला तर देव’, या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला. अशा या महान अभिनय सम्राटाचे २ मार्च १९८६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -