घरफिचर्सश्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव पेशवे

श्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव पेशवे

Subscribe

पहिले बाजीराव पेशवे यांचा आज स्मृतिदिन. बाजीराव हे मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी होते. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावांनीही ते इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७00 रोजी झाला. बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी-शिकार्‍यांत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यांना लाभले. सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या (1718) मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावांच्या हाताखाली होती. छत्रपती शाहूंनी त्यांची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता १७ एप्रिल १७२0 रोजी त्यांना पेशवेपदाची वस्त्रे दिली.

बाजीरावांची प्रारंभीची तीन-चार वर्षे खानदेश-बागलाण-कर्नाटक या भागांत स्वारी-शिकारीत गेली. पेशव्यांची फौज कर्नाटकात दूर गेली आहे, असे पाहून १७२७ मध्ये निजामाने कोल्हापूरच्या संभाजीशी संधान बांधले. शाहूंच्या छत्रपतीपदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव उघड होता. बाजीरावांनी निजामाचा हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली. 1७२७ चा पावसाळा संपताच मोठ्या फौजेनिशी ते निजामाच्या मुलखावर चालून गेले. खानदेश, बर्‍हाणपूर, सुरत या भागांत चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाचा तोफखाना निरुपयोगी केला आणि निजामाच्या सैन्याला बेजार केले. अखेर निजाम शरण आला. ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेवगावच्या तहाने युद्धविराम झाला.

- Advertisement -

शाहूंच्या छत्रपतीपदास निजामाने मान्यता दिली; बाजीराव स्वभावाने तापट होते. सेनापतीस योग्य असे धैर्य व घाडस त्यांच्या अंगी होते. त्यांचे खासगी जीवन अत्यंत साधे, मराठी शिपाईगड्यास साजेसे होते. बाजीरावांनी मराठेशाहीची शान वाढविली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर केले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवी क्षितिजे निर्माण केली. अशा या रणझुंजार सेनानीचे २८ एप्रिल १७४0 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -