घरफिचर्सआठवणीतील गीतरामायणकार

आठवणीतील गीतरामायणकार

Subscribe

विख्यात मराठी कवी, पटकथा आणि संवाद लेखक गजानन दिगंबर माडगूळकर यांचा आज स्मृतिदिन. शब्दांवरील प्रभुत्वाच्या साहाय्याने त्यांनी गीतरामायणाची भेट महाराष्ट्राला दिली. पुढे गदिमा या नावाने ते परिचित झाले. 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील शेटफळे या ठिकाणी गदिमांचा जन्म झाला. आटपाडी, कुंडल आणि औंध या ठिकाणी त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. गणितामुळे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. लहानपणापासूनच लिहिण्याची, नकला करण्याची आवड असलेल्या गदिमांनी घरच्या बिकट परिस्थितीमुळे चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी त्यांनी चित्रपटांच्या कथा, संवाद, गीतलेखनाचे काम केले. 1938 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका करून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात केली.

विख्यात मराठी कवी, पटकथा आणि संवाद लेखक गजानन दिगंबर माडगूळकर यांचा आज स्मृतिदिन. शब्दांवरील प्रभुत्वाच्या साहाय्याने त्यांनी गीतरामायणाची भेट महाराष्ट्राला दिली. पुढे गदिमा या नावाने ते परिचित झाले. 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील शेटफळे या ठिकाणी गदिमांचा जन्म झाला. आटपाडी, कुंडल आणि औंध या ठिकाणी त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. गणितामुळे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. लहानपणापासूनच लिहिण्याची, नकला करण्याची आवड असलेल्या गदिमांनी घरच्या बिकट परिस्थितीमुळे चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी त्यांनी चित्रपटांच्या कथा, संवाद, गीतलेखनाचे काम केले. 1938 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका करून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात केली. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या मा. विनायक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सुरुवातीच्या काळात गदिमांनी वि.स.खांडेकर यांच्याकडे लेखनिक म्हणूनसुद्धा काम केले. गदिमांचे हस्ताक्षर खूप छान होते. खांडेकरांकडे काम करतानाच त्यांना वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या कविता लेखनाच्या कामाला वेग लागला. त्यातूनच पुढे त्यांनी स्वतःची सुगंधी वीणा (1949), जोगिया (1959), चार संगीतिका (1956), गीतरामायण (1957), काव्यकथा (1962), चैत्रबन (चित्रपटगीते) (1962), गीतगोपाल (1967), गीतसौभद्र (1968) अशी काव्यनिर्मिती केली.
माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे, बाई मी विकत घेतला शाम यांसारख्या अनेक गीतांमधून त्यांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेत तत्त्वज्ञान सांगितले. चित्रपटातील गीतांप्रमाणेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यातही महत्त्वाची कामगिरी बजावली. 1942 च्या आंदोलनात, सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवाड्यांची निर्मिती करत लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीतरामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.
कविता, गीत याप्रमाणेच गदिमांनी कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाड.मय प्रकारातसुद्धा लेखन केले. त्यांनी जवळपास 15 लघुकथा, 80 पटकथा, 44 मराठी चित्रपटांच्या कथा, 76 चित्रपटांचे संवादलेखन, 23 हिंदी पटकथा, 10 हिंदी चित्रपट कथा, 5 हिंदी चित्रपटांचे संवाद आदी विपुल लेखन केले. एवढेच नाही तर त्यांनी सुमारे 25 (24 मराठी व एका हिंदी) चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केला. गदिमांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेत 1969 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री या किताबाने गौरवले. 1962 ते 1974 अशी तब्बल 12 वर्ष गदिमा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यसुद्धा होते. 1973 मध्ये यवतमाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 14 डिसेंबर 1977 रोजी पुणे येथे गदिमांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -