घरफिचर्सथोर समाजसुधारक - महात्मा ज्योतिबा फुले

थोर समाजसुधारक – महात्मा ज्योतिबा फुले

Subscribe

भारतीय समाज सुधारणेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव अग्रणी येते. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. क्रांतीसूर्य महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना केली. त्याआधारे शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. १८८८ मध्ये जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ‘शेतकर्‍यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.

भारतीय समाज सुधारणेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव अग्रणी येते. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. क्रांतीसूर्य महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना केली. त्याआधारे शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. १८८८ मध्ये जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ‘शेतकर्‍यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.
११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी त्यांचा जोतिबा फुले यांचा जन्म झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. ज्योतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ज्योतिराव यांचा सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्ता याने महात्मा फुले यांना ‘सेंद्रीय बुद्धीवंत’ असे संबोधले आहे. करारी वृत्तीच्या ज्योतिरावांना गुरुजनांविषयी व वडीलधार्‍या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. कबीरांचे अनेक दोहे त्यांना तोंडपाठ होते.
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्य्र आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्यांनी स्त्री-शिक्षणासाठी पुढाकार घेतला. १८४८ मध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून ज्योतिरावांनी तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. त्यानंतर १८५२ मध्ये अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून विरोध होऊनही ज्योतीराव मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. ज्योतीरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.
त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा आसूड’या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्य्राची वास्तवता विशद केली आहे. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकर्‍यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.
२४ सप्टेंबर १८५३ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावेळी स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. ’सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ज्योतिबांनी ’गुलामगिरी’ हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले या थोर समाजसुधारकाने जगाचा निरोप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -