Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स निसर्गरम्य शहापूरमध्ये साकारतेय मेगा टाऊनशिप !

निसर्गरम्य शहापूरमध्ये साकारतेय मेगा टाऊनशिप !

या मेगा प्रोजेक्टमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार वन रूम किचनचे प्लॅटही साकारण्यात आले आहेत. त्यामुळे निसर्गरम्य व प्रदुषणमुक्त ठिकाण असलेल्या शहापूरकडे सर्वसामान्य ग्राहकांची पावले वळू लागली आहेत.

Related Story

- Advertisement -

सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी घरे, उत्तम हवामान, निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त, ऐतिहासिक वारसा आणि टप्याटप्प्याने विकसित होणारे ठिकाण म्हणजे शहापूर. दिवसेंदिवस घरांच्या किंमती वाढत असतानाच सामान्य ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शहापूरमध्ये मोठमोठ्या विकासकांचे मेगा टाऊनशिप प्रकल्प साकारले जात आहेत. विशेष म्हणजे या मेगा प्रोजेक्टमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार वन रूम किचनचे प्लॅटही साकारण्यात आले आहेत. त्यामुळे निसर्गरम्य व प्रदुषणमुक्त ठिकाण असलेल्या शहापूरकडे सर्वसामान्य ग्राहकांची पावले वळू लागली आहेत.

मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ शहापूर तालुक्यातून जातो. उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा आहे. वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा ही रेल्वे स्थानके शहापूर तालुक्यात येतात. आसनगाव स्टेशनवरून शहापूरला जाते येते. रेल्वे आणि रस्ते असे देान्ही मार्ग शहापूरला जोडले आहेत. मुंबईहून शहापूरकडे जाण्यासाठी रेल्वेचा अवघा साधारण दीड तासाचा प्रवास आहे. त्यामुळे शहापूर हे ठाणे़- मुंबईच्या अगदी जवळ आहे. तसेच भविष्यात शहापूरहून विरार ते अलिबाग आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत वाहतूक मार्गाचाही प्रस्ताव आहे. रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग वरदान ठरणार आहे.

- Advertisement -

आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रूग्णांसाठी शहापूर येथे जिल्हा रूग्णालय आहे. तसेच किन्हवलीत कॉलेजची सोय असून माहिती तंत्रज्ञान क्षे़त्रात उच्च शिक्षणाची सोय याठिकाणी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूर न जाता आपल्या गावातच उच्च शिक्षण मिळवता येते. शहापूर तालुक्यातील डोळखांब, किन्हवली, शेणवा सरळगाव, मुरबाड या परिसरात मोठमोठे गृहप्रकल्प आकाराला येत आहेत. मुरबाड परिसरात एमआयडीसी आहे. डोळखांबजवळ घाटघर विद्युत प्रकल्प आहे. शहापूर निसर्ग पर्यटन केंद्र वाफे आहे.

अद्ययावत विकास वैभव वनसंपदा, जलसंपदा १२ एकर क्षेत्रात केंद्रात हे साकारले आहे. त्यामुळे उत्तम पर्यटन केंद्र म्हणून त्याला पसंती मिळत आहे. म्हणून शहापूरकडे पर्यटकांचाही ओढा असतो. मुंबईकरांची तहान भागवणारा तालुका म्हणूनही शहापूरची ओळख आहे. भातसा, तानसा, वैतरणा आणि अप्पर वैतरणा ही धरणे आहेत. त्यामुळे शहापूरचे विविधांगी वैशिष्ट आहे.

- Advertisement -

मुंबई ठाण्याच्या तुलनेत शहापूरमध्ये जागांच्या किमती कमी आहेत. त्यामुळे अनेक मोठमोठ्या विकासकांकडून शहापूरमध्ये मेगा प्रोजेक्ट साकारले जात आहे. त्यात मध्यमवर्गीयांना परवडतील अशी अफोर्डेबल घरे उपलब्ध हेात आहेत. शहापूरमध्ये कर्म ग्रुपचे अनेक मेगा प्रकल्प सुरू आहेत. कर्म पंचतत्व हा मेगा प्रोजेक्टमध्ये ग्राहकांना बँकेचे कर्ज न घेता दर महिना साडेसात हजार रूपये इएमआय भरण्याची सोयही कर्मने केली होती.

त्यामुळे घर खरेदी करण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न साकारले आहे. विकासकांकडून ग्राहकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना इथली गुंतवणूक त्याच्या बजेटमध्ये व भविष्यकालीन फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शहापूरात मोठमोठ्या गृहसंकुलांचे जाळे तयार होत आहे. तसेच शहापूरमधील निसर्गसौँदर्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रो-हाऊसही होत आहेत. गृहसंकुलांबरोबरच रो हाऊसलाही तितकीच मागणी वाढताना दिसत आहे.

ब्रिटीशकालीन बाजारपेठ

ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य याच तालुक्यात आहे. शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून या तालुक्यामध्ये जवळजवळ ६० गावे येतात. त्यापैकी किन्हवली, डोळखांब, शेणवा, वासिद ही बाजाराची प्रमुख ठिकाणे आहेत. भरपूर पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन जास्त असून भाताचे कोठार म्हणून शहापूर तालुका ओळखला जातो. ब्रिटीश काळात एक उत्तम बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. आजही गाव खेड्यातील लोक शहापूरच्या बाजारात येतात. नो केमिकल झोनमुळे औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत. तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे.

ही आहेत शहापूरची वैशिष्ठ्ये

  • रेल्वे आणि रस्ते कनेक्टीव्हिटी
  • पर्यटन केंद्र
  • निर्सग सौंदर्य
  • ऐतिहासिक स्थळ
  • प्रदूषण मुक्त
- Advertisement -