घरफिचर्सपरत एकदा तो अनुभव घेण्यासाठी ‘इंद्रवदन’मध्ये डेरेदाखल

परत एकदा तो अनुभव घेण्यासाठी ‘इंद्रवदन’मध्ये डेरेदाखल

Subscribe

गेले काही महिने १०० व्या महोत्सवाकडे चाललेली वाटचाल whatsapp वरून ऐकताना मात्र मन अधीर झालंय. कधी एकदा हा शतकमहोत्सवी उत्सव चालू होतोय आणि आम्ही सर्व जुने रहिवासी परत एकदा तो अनुभव घेण्यास इंद्रवदनमध्ये डेरेदाखल होतोय. त्या अनुषंगाने जितेंद्र (उदय) बर्वे यांच्या आठवणी...

आमची पिढी लहानाची मोठी झाली ती इंद्रवदनमध्ये; पण सोसायटीतील आधीची पिढी ही तुळशीदास तेजपाल चाळीपासून एकत्र आहे. त्याअर्थाने हे एक गावच आहे.फ्लॅटमध्ये वास्तव्य असले तरी वातावरण हे चाळीसारखेच होते. १३० बिर्‍हाडे गुण्या-गोविंदाने रहात होती आणि आहेत आणि रहातीलही …. आजची ही चौथी पिढी इंद्रवदन मध्ये वास्तव्यास आहे. सोसायटीतील बहुसंख्य मंडळीही गेले शंभर वर्षे एकत्र राहत आहेत.

कुठच्याही कुटुंबात एकी असते तसे वाद विवादही असतात …. इंद्रवदनमधेही आहेत … व्यक्ती तितक्या प्रवृत्ती दुसरे काय? पण ह्या इंद्रवासियांचे खरे रूप बघायला मिळते ते कुठच्याही सार्वजनिक उत्सवात … मग ते जानेवारीतील फन-फेअर असो की गोकुळाष्टमी, की होळी. अर्थात ह्या सगळ्यांवर कडी होते ती मात्र गणेशोत्सवात!

- Advertisement -

गणेशोत्सव हा खर्‍या अर्थाने सोसायटीचा एक मानबिंदू … अख्खी सोसायटी गणेशोत्सवात पटांगणात असते. सुमारे २० वर्षे मी पुण्यात वास्तव्यास आहे. अगदी खरे सांगायचे झाले तर गणेशोत्सवात आपण इंद्रवदनमध्ये राहत नाही याची रुखरुख लागते . १९८८ साली झालेला ७० व गणेशोत्सव आणि १९९३ साली झालेला ७५ व उत्सव आमच्या पिढीने अगदी जगाला … ऐन पंचविशीत असल्याने उत्साह, वय करिअरची सुरुवात असल्याने खूप मज्जा केली. आजही ७० आणि ८५ व्या वर्षात केलेल्या कार्यक्रमांची, मंदावल्या मस्तीची आठवण आली की आज आपण १०० व्या वर्षी इंद्रवदनमध्ये नाही ह्याची खंत वाटते.

इंद्रवदनचा गणेशोत्सव हा दादर विभागातील एका अत्यंत जुना आणि प्रसिद्ध गणेशोत्सव. ह्याचे कारण नुसते देखावे उभे न करता विविध कार्यक्रमांनी नटलेला हा उत्सव, याला कधीही गालबोट लागले नाही. मला खात्री आहे लोकमान्य असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. कारण गणेशोत्सव चालू करण्याचे त्यांचे उद्दिष्ट खर्‍या अर्थाने इंद्रवदन सोसायटीने सार्थकी लावले आहे, असे मला वाटते. सोसायटीतील सर्वांना एकत्र आणणारा हा उत्सव म्हणजे खेळ, मनोरंजन, साहित्य, यांची पर्वणी असते तसेच अनेक सामाजिक विषयांवर जनजागृतीही होते तसेच कलेची उपासना केली जाते. हे सर्व फक्त सोसायटीतील रहिवाश्यांसाठी नव्हे तर आजूबाजूच्या लोकांसाठी आणि आमच्यासारख्या माजी रहिवाश्यांसाठी सुद्धा उपलब्ध असते.

- Advertisement -

गेले काही महिने १०० व्या महोत्सवाकडे चाललेली वाटचाल whatsapp वरून ऐकताना मात्र मन अधीर झालंय. कधी एकदा हा शतक महोत्सवी उत्सव चालू होतोय आणि आम्ही सर्व जुने रहिवासी परत एकदा तो अनुभव घेण्यासाठी इंद्रवदनमध्ये डेरेदाखल होतोय.

शतक महोत्सव छान होणार यात शंका नाही; पण … शतक महोत्सवाच्या निमित्ताने ‘शतकवीर’ सचिन तेंडुलकर हजेरी लावू शकला तर खरंच मज्जा येईल. सचिनची उपस्थिती म्हणजे ICING on the CAKE असेल … असो ….. वाट पाहतोय गणेशोत्सव सुरु होण्याची!



-उदय बर्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -