घरफिचर्ससारांशमैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने...

मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने…

Subscribe

ओ मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने... आनंद चित्रपटात हे गाणं राजेश खन्नावर चित्रित झालं असलं तरी त्यात अमिताभ, सीमा व रमेश देवदेखील दर्शन देतात. चित्रपटात ‘आनंद’ या युवकाच्या भूमिकेतला राजेश खन्ना एका असाध्य रोगाने (कर्करोगाने) पीडित असून केवळ काही दिवसांचा पाहुणा आहे. त्याच्या मनातल्या सात रंगांच्या स्वप्नाचं चित्र या गाण्यात रेखाटलेलं आहे. हे चित्र अतिशय अनोखं आहे. आपल्या मनाला आरपार स्पर्शून जाणारं आहे. गुलजारसाहेबांनी फार सहजतेने लिहिलेल्या ‘छोटी, छोटी बातो की है यादे बडी...’ या साध्याशा ओळीतून खूप गहिरा अर्थ सांगितलेला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतले सुविख्यात निर्माते, दिग्दर्शक, लेखक व संपादक हृषीकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’ हा गाजलेला चित्रपट १९७१ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचं लेखन बिमल दत्ता, गुलजार, डी. एन. मुखर्जी, हृषीकेश मुखर्जी व बिरेन त्रिपाठी यांनी केलं होतं. यामध्ये तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्ना प्रमुख, तर नंतर सुपरस्टार झालेला अमिताभ बच्चन सहाय्यक भूमिकेत होते. शिवाय सुमिता सन्याल, रमेश आणि सीमा देव सहकलावंत होते. चित्रपटाचं छायांकन जयवंत पठारे यांनी केलं होतं. गीतकार योगेश आणि गुलजार यांच्या गाण्यांना सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलं होतं.

हृषीदांनी आधी लता मंगेशकर यांना चित्रपटाला संगीत देण्याची विनंती केली होती. कारण दीदीने काही मराठी चित्रपटांना ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिलं असल्याचं त्यांना ठाऊक होतं, मात्र दीदीने यास नम्रपणे नकार देऊन फक्त पार्श्वगायन केलं. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या वर्गवारीत फिल्म फेअर पुरस्कारही मिळाले होते.

- Advertisement -

या चित्रपटात कही दूर जब दिन ढल जाए… (मुकेश), जिंदगी कैसी है पहेली… (मन्ना डे), मैने तेरे लिए ही… (मुकेश), ना जिया लागे ना… (लता) अशी अतिशय अर्थपूर्ण गाणी होती. शिवाय ‘मौत तू इक कविता है…’ ही गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेली अमिताभच्या धीरगंभीर आवाजातली भावपूर्ण कवितादेखील रसिकांच्या स्मरणात आहे. यातली कही दूर जब… आणि जिंदगी कैसी है… ही दोन गाणी योगेश, तर उर्वरित दोन गाणी गुलजारने लिहिली आहेत. आजच्या भागात त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर हा दृष्टिक्षेप.

मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने
सपने सुरीले सपने
कुछ हंसते, कुछ गम के
तेरी आंखो के साये, चुराये रसिली यादों ने
ओ मैने तेरे लिए ही…

- Advertisement -

छोटी बाते, छोटी छोटी बातो की है यादे बडी
भूले नही, बीती हुई एक छोटी घडी
जनम-जनम से आंखे बिछाई तेरे लिए इन राहों ने
ओ मैने तेरे लिए ही…

रुठी राते, रुठी हुई रातोंको मनाया कभी
तेरे लिए मिठी सुबह को बुलाया कभी
तेरे बिना भी, तेरे लिए ही, दिए जलाए आहों ने
ओ मैने तेरे लिए ही…

भोले-भाले, भोले-भाले दिल को बहलाते रहे
तन्हाई में तेरे खयालो को सजाते रहे
कभी-कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबो ने

ओ मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने
सपने सुरीले सपने…

चित्रपटात हे गाणं राजेश खन्नावर चित्रित झालं असलं तरी त्यात अमिताभ, सीमा व रमेश देवदेखील दर्शन देतात. चित्रपटात ‘आनंद’ या युवकाच्या भूमिकेतला राजेश खन्ना एका असाध्य रोगाने (कर्करोगाने) पीडित असून केवळ काही दिवसांचा पाहुणा आहे. त्याच्या मनातल्या सात रंगांच्या स्वप्नाचं चित्र या गाण्यात रेखाटलेलं आहे. हे चित्र अतिशय अनोखं आहे. आपल्या मनाला आरपार स्पर्शून जाणारं आहे.

गुलजारसाहेबांनी फार सहजतेने लिहिलेल्या ‘छोटी, छोटी बातो की है यादे बडी…’ या साध्याशा ओळीतून खूप गहिरा अर्थ सांगितलेला आहे. या शब्दांमधून फार मोठं सत्य गुलजारने व्यक्त केलं आहे. जीवनात आलेल्या असंख्य अनुभवाला भिडल्याशिवाय आणि त्याचं संचित गाठीशी असल्याशिवाय असं काही लिहिता येईल असं वाटत नाही. संगीतकार सलील चौधरी आणि गायक मुकेश यांच्या चित्रपट कारकिर्दीतली ही एक अविस्मरणीय अशी रचना आहे. रवींद्र संगीताचा श्रवणीय आविष्कार असलेलं या चित्रपटातलं दुसरं एक सोलो गीतही अर्थपूर्ण आहे. लताच्या स्वर्णिम स्वरांनी सजलेल्या या गाण्याचे शब्द पुढीलप्रमाणे…

ना, जिया लागे ना
तेरे बिना, मेरा कही, जिया लागे ना
ना, जिया लागे ना…

जीना भूले थे कहां याद नही
तुझको पाया है जहां, सांस फिर आई वही
जिंदगी, तेरे सिवा हाय, भाए ना
ना, जिया लागे ना…
पिया तेरी बावरी से रहा जाए ना

तुम अगर जाओ कभी जाओ कही
वक्त से कहना जरा, वो ठहर जाए वही
वो घडी, वही रुहे ना जाए ना
ना जिया लागे ना…

चित्रपटात सुमित्रा सन्याल या अभिनेत्रीवर चित्रित झालेल्या या गाण्यातून तिच्या मनातल्या उत्कट भावना संयमाने नि हळूवारपणे व्यक्त झाल्या आहेत. आपला सखा सोबत नसताना तिचं मन किती कातर होतं, कसं सैरभर होतं आणि त्याचा विरह किती छळतो याचा प्रत्यय आणून देणारं हे गाणं म्हणजे रागदारी संगीताचं कोंदण लाभलेली एक भावकविताच आहे. तिच्या मनातली कालवाकालव, हुरहूर, वेदना, एकाकीपणा, त्याच्या सहवासाची तीव्र ओढ गुलजारने तरल शब्दांत मांडली आहे.

गुलजार-सलीलदा या जोडीचा ‘मेरे अपने’ हा चित्रपट याच वर्षात आला होता. १९६९ मधल्या ‘अपांजन’ या तपन सिन्हा दिग्दर्शित बंगाली चित्रपटाची ही हिंदी आवृत्ती होती. याचं दिग्दर्शन खुद्द गुलजारनेच केलं होतं. यातली कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो… (किशोर कुमार), रोज अकेली आए, रोज अकेली जाए, चांद कटोरा लिए भिखारन रात… (लता) आणि हालचाल ठीक ठाक है, सबकुछ ठीक ठाक है… (किशोर-मुकेश) ही तिन्ही वेगळ्या ढंगातली गाणी वैशिष्ठ्यपूर्ण बनलेली आहेत.

आनंद आणि मेरे अपने या दोन चित्रपटांशिवाय गुलजार-सलीलदांनी ‘अचानक’ नामक एक चित्रपट सोबत केला. या चित्रपटासाठी गुलजार यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात एकही गाणं नाही. तसेच या दोघांनी ‘स्वामी विवेकानंद’ नावाचा अल्बमही केला असून तो सलीलदांच्या निधनानंतर म्हणजे १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. यातली गाणी येसूदास, अनुप जलोटा, कविता कृष्णमूर्ती व अंतरा चौधरी (सलीलदांची कन्या) यांनी गायली होती. थोडक्यात काय तर गुलजार आणि सलील चौधरी यांनी संख्येने कमी पण गुणवत्तेत सरस अशी कामगिरी केली आहे हे नि:संशय.

–प्रवीण घोडेस्वार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -