घरफिचर्सट्रेन लेट डोकं आउट

ट्रेन लेट डोकं आउट

Subscribe

फूटपाथवर लावलेल्या दुकानामुळं नीट चलायला मिळना, डोकं आउट चालत्या गाड्यायच्या फुकाच्या भोंग्यानं, डोकं आउट सुलभच्या मुतारीच्या वासानं, डोकं आउट कचराकुंडीबाहेर पडलेल्या कचर्‍याच्या दर्शनानं, डोकं आउट घरी गेलो, बेल बंद टीव्हीच्या आवाजाला खिंडार पाडायसाठी वाजवलेल्या कडीचा आवाजाने थांबल्याजागी दिमाग आउट दार उघडल्या उघडल्या बायकोनं विचारलं आणली का भाजी ... विसरलो... कारण डोकं आउट

ट्रेन खाली पर बसायला चौथी सीटबी महाग बघून दिमाग शॉट…
ट्रेन टायमावर, गर्दी लय , तुम्हाला सोडून सुटली ट्रेन, भेजा खराब. ट्रेन टायमावर, गर्दीचा अंदाज नाय कारण बिना अनाऊन्समेंट प्लॅटफॉर्म चेंज, डोक्याची आई अन ताई. घाई घाई ट्रेन समोर, पण पासवाल्याने टायमात पास नाही दिला. ट्रेन आउट जाती, ट्रेन बघून काळजात जाळ तुमचं डोकं आउट…
थोडक्यात काय ? ये भी बहाणा, ऐसे कितने बहाणे अच्छे है डोकं आउट होने के लिये. आज खडे खडे आमची डोकं आउटची कविता रंग भरूलालतीच, की गाववाला जगताप हिरवं तोंड करीत बसल्याजागूनच आरडला…
’अये गपा की आदीच आपलं डोकं खराबाय आनि शॉट द्यूनुका.’ ‘हे घ्या, गर्दीत पिचकलालोय, आम्ही आन बसल्याजागी डोसकं खराब याचं. याला एरंडेल तेल पाजवावं लागतंय आता. सुकासुकी डोकं खराब करायचा बेक्कार नाद लागलाय याला’ मी बोललो तसं बाकी पब्लिक हसली जगताप जागच्या जागी आउट.
’सही है’ दात विचकीत मिसरा बोलला. जगतापनं निस्ता करपट चेहरा केला, अन आमचं पुन्हा सुरु झालं.
दिवाळीतला फराळ बघून रोजचं गोड गोड हाणुन आपलं डोकं आउट. ऑफिसमधी बॉसची तंतरली, वाढल्या कामानं केलं आपलं डोकं आउट. डक लुईसनं घात केला क्रिकेटीत, भारत हारला आपलं डोकं आउट. ’गॅस के भाव बढे’ मिसरा म्हणला तसं ’मुंबई में उत्तर के लोग बढे’ जिग्नेस भाई चढून बोलला, आन मग खडे खडे भांडूनतंडुन दोघांचंइ डोकं आउट.
ट्रेन रुकी, फॅन बंद, सिग्नल मिळना गेलाय, आता खडे खडे सबका भेजा आउट. ट्रेन निघाली, दहिसर गेलं, खडे खडे पायाला गोळे आले तरी बसलेले जगताप काही उठनात, चिडू चिडू भांडू भांडू पुन्हा आमचा दिमाग आउट. भायंदर गेलं, नायगाव गेलं डोकं आउट, डोकं आउट आता नुसतं बसलेल्याकडं बघितलं तरी उडूलालते फ्युज,लागलालता करंट अन शॉटनं डोकं आउट. आता आऊटचं कारण सापडना गेले म्हणून थांबल्या जागी आमचे भेजे,दिमाग,ब्रेन, मेंदू सब एकसाथ आउट. आमचं स्टेशन आलं बॅग, डब्बा, ढकलणारी गर्दी आणि आमचं जागेवर असलेल्या डोक्यात बंद पडायला आलेलं इचाराचं डोकं भरून वन पीस मधी आम्ही आउट. आउट आउट वाटलं संपला आजचा बाउट पण मग ऑटोवाल्याने घराकडं जायला नाही म्हणला, डोकं आउट
फूटपाथवर लावलेल्या दुकानामुळं नीट चलायला मिळना, डोकं आउट चालत्या गाड्यायच्या फुकाच्या भोंग्यानं, डोकं आउट
सुलभच्या मुतारीच्या वासानं, डोकं आउट कचराकुंडीबाहेर पडलेल्या कचर्‍याच्या दर्शनानं, डोकं आउट घरी गेलो, बेल बंद टीव्हीच्या आवाजाला खिंडार पाडायसाठी वाजवलेल्या कडीचा आवाजाने थांबल्याजागी दिमाग आउट दार उघडल्या उघडल्या बायकोनं विचारलं आणली का भाजी … विसरलो… कारण डोकं आउट
ऐकून तिचं डोकं आउट … माझं तर आधीच आउट
खेळ मस्त डोकं आउटचा …
आता झोपल्या जागी
टाइमप्लिज मधी सुद्धा निरंतर खेळ हा ’डोकं आउट.. डोकं आउट’

– प्रसाद कुमठेकर (मुंबई नगरी बडी बाका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -