घरफिचर्समुलांसाठी लिहिणारे लेखक विनायक ओक

मुलांसाठी लिहिणारे लेखक विनायक ओक

Subscribe

शाळेतील मुलांना पुरवणी वाचन म्हणून वाचण्यासाठी मेजरथॉमस कँडीसारखी शिक्षण खात्याशी संबंधित माणसे स्वतःही छोटी-छोटी पुस्तके लिहीत होती. अशा काळात ज्यांनी मुलांसाठी लिहिणे हेच आपले जीवित कर्तव्य मानले अशा मराठी लेखकांत विनायक ओक हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे’ हा रामदासांचा उपदेश ओकांनी तंतोतंत पाळला होता.

विनायक कोंडदेव ओक हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार होते. मुलांना बहुश्रुत बनवण्यासाठी, त्यांना वाचनाचा खरा आनंद देण्यासाठी त्यांनी वाचणे आवश्यक आहे, असे शालेय शिक्षणाला जोड म्हणून पूरक वाचन काय देता येईल याचा त्यांनी विचार केला. त्यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1840 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण इंग्रजी तिसरीपर्यंतच झाले होते. दरमहा आठ रुपये पगारावर प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला प्रारंभ केला आणि दरमहा १०० रुपये पगार असलेले शिक्षणाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.

१८६० च्या सुमारास ओकांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. तो काळ मराठीत विविध विषयांवर विपुल पुस्तके प्रसिद्ध होणारा काळ नव्हता. फारशी मराठी पुस्तकेच अस्तित्वात नसल्यामुळे ‘दक्षिणा प्राइज कमिटी’ मराठी ग्रंथलेखनाला उत्तेजन देण्यासाठी पारितोषिके देत होती. शाळेतील मुलांना पुरवणी वाचन म्हणून वाचण्यासाठी मेजरथॉमस कँडीसारखी शिक्षण खात्याशी संबंधित माणसे स्वतःही छोटी-छोटी पुस्तके लिहीत होती. अशा काळात ज्यांनी मुलांसाठी लिहिणे हेच आपले जीवित कर्तव्य मानले अशा मराठी लेखकांत विनायक ओक हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे’ हा रामदासांचा उपदेश ओकांनी तंतोतंत पाळला होता.

- Advertisement -

दररोज निदान दोन पाने तरी लेखन केलेच पाहिजे, असा त्यांनी स्वत:ला दंडक घालून घेतला होता. ओकांनी १८८१ मध्ये ‘बालबोध’ नावाचे लहान मुलांसाठी असलेले मासिक सुरू केले. या मासिकाचे ते ३४ वर्षे संपादक होते. मासिकाचा सर्व मजकूर ते स्वत:च लिहून काढीत. या मासिकातील लेखनाव्यतिरिक्त ओकांच्या नावावर अनेक पुस्तके आहेत. त्यांची संख्या पन्नासच्या जवळपास भरेल. एकट्या ‘बालबोध’ मासिकातच चारशेहून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. छोटे-छोटे निबंध लिहून ओकांनी नव्या पिढीला शालेय पुस्तकात नसलेली माहिती दिली. अशा या महान कादंबरीकाराचे 9 ऑक्टोबर 1914 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -