घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: वृत्तपत्रे आणि खडे वापरून तयार केला देखावा

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: वृत्तपत्रे आणि खडे वापरून तयार केला देखावा

Subscribe

कोरोनाचे संकट देशातच नव्हे तर संपूर्ण जगात असून, लोकांवर काय संकट आले त्याची ही झलक नागपूरच्या अभय रामदास भेंडे यांनी त्यांच्या देखाव्यातून दाखवली आहे. नागपूर येथील शेष नगर, नंदनवन येथे राहणाऱ्या अभय यांनी वृत्तपत्रे आणि खडे वापरून देखावा तयार केला आहे. २०२० हे वर्ष आपल्यासोबत भरपूर चांगल्या-वाईट आठवणी घेऊन आले आहे, असे अभय म्हणतात. विशेष म्हणजे त्यांच्या देखाव्यात सजावटीसह कोरोना विषाणूचा वध करताना गणपती बाप्पा दाखवण्यात आला आहे. तसेच या विषाणूच्या लवकरात लवकर विनाशासाठी गणपती बाप्पाकडे साकडे त्यांनी घातले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -