घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: पार्वतीनंदन 'बालगणेश'

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: पार्वतीनंदन ‘बालगणेश’

Subscribe

आशिष पिंगळे यांनी यंदा इकोफ्रेंडली देखावा तयार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पार्वतीनंदन ‘बालगणेश’ यावर आधारित हा देखावा साकारला आहे. या देखाव्यात नोहाकालीकाई धबधबा दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे देखाव्यात?

मेघालय राज्यातील चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश असून येथील सर्वात उंच नोहाकालीकाई धबधबा या देखाव्यातून दाखवण्यात आला आहे. खरतर या निसर्गरम्य परिसरात अनेक छोटे – मोठे धबधबे, नदी-नाले, झाडं-झुडपे, अजस्त्र पर्वतरांगा, थंड हवा आणि निमुळते रस्ते आपल्याला पाहावयास मिळत आहेत. मेघालयला स्कॉटलंड ऑफ ईस्ट असेही संबोधले जाते. अशा या मनमोहक परिसरात पार्वती नंदन आपले बाळपण मजेत घालवताना दिसत आहेत.

श्रीगणेश म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचशक्ती आहे. पृथ्वीवरील प्रत्येकाचे जीवन टिकवणे म्हणजेच प्रत्येक बारीक-मोठा जीव आपल्याला आता सांभाळणे गरजेचे झाले आहे. कारण सर्व पर्यावरणातील घटक हे अन्न साखळीशी निगडित आहे. पर्यावरणाचा ऱ्हास केला की काय होते, याची प्रचीती आपणा सर्वांना आता २०२० मध्ये आली आहे, म्हणून या सर्व जीवांना जपा हाच संदेश बाप्पा या देखाव्यातून देत आहे.

- Advertisement -

या देखाव्यात वापरलेले साहित्य हे सगळे नैसर्गिक आहे. जसे कपडे, हिरवे लान्स, शाडू माती, दगड गोटे, वाळू, काच, पाण्याचे तळे आणि मूर्तीचे रंग हे पाण्यात विरघळणारे आहे. उरलेले घरगुती साहित्य पुनर्वापर करण्याजोगे आहे.

आशिष पिंगळे म्हणतात की, ‘मला वाटते सगळ्यांनी आपआपली मूर्ती घरी करावी, ती बनवण्यात काही वेगळीच मजा असते. एक नवीन चैतन्य निर्माण होते. बाप्पाचे वेगवेगळे रूप आपण करू शकतो. या अकरा दिवसात घरात प्रसन्न, पवित्र, उत्साहचे वातावरण असते’.

इको फ्रेंडली मूर्ती असल्याने आम्ही ती घरीच टबमध्ये विसर्जित करतो आणि त्यात एक छान से रोप लावतो जे बाप्पाला आवडते जसे अनंता, जास्वंदी, गुलाब. ‘उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. भक्षण करण्यासाठी नसतात. उत्सव साजरे करीत असताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होता कामा नये. गौरी-गणपतीची हीच खरी शिकवण असते. आपण निसर्गाला जपलेच पाहिजे. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन हे नदी नाल्यात, समुद्रात न करता कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी करावे. त्याचप्रमाणे प्लास्टिक ही आपल्या जीवनातील गरजेची गोष्ट होऊन गेली आहे. तिचा जास्तीत जास्त पुर्नवापर (रिसायकल किंवा रियुज) करा आणि हळू हळू बंद करूया’, असा संदेश आशिष पिंगळे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -