घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: डाॅक्टर,पोलिसांना दास परिवाराकडून मानाचा मुजरा!

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: डाॅक्टर,पोलिसांना दास परिवाराकडून मानाचा मुजरा!

Subscribe

मनिष दास यांच्या घरी १० दिवस गणपती बाप्पा विराजमान होतो. मनिष दास यांच्या घरी असलेल्या बाप्पाची मुर्ती ही शाडूच्या मातीची आहे आणि या मुर्तीला साजेसेच डेकोरेशन त्यांनी यावर्षी बाप्पासाठी केलं आहे. यावर्षी देशावर कोरोनाचं संकट आहे. आणि यंदाच्या उत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे. पण या कठीण काळात पोलीस आणि डॉक्टर खचून न जाता लढा देत आहेत. त्यामुळे या कोरोना योध्दांना सलाम म्हणून मनिष दास यांनी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची थीमच ती केली आहे.

मनिष दास गणपती

मनिष दास यांच्या घरी आलेल्या बाप्पाने डॉक्टर आणि पोलीसाचे रूप धारण केलं आहे. बाप्पाच्या एका बाजूला कोविड १९ हे हॉस्पिटल तर दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशन आहे. या देखाव्यातून डाॅक्टर,पोलिस यांना दास परिवाराने मानाचा मुजरा केला आहे.

- Advertisement -

कोरोना योध्दांना सलामजरी या देखाव्यातून केला असला तरी तो देखावा इको फ्रेंडली असावा याकडे लक्ष देण्यात आलं आहे. ही संपूर्ण सजावट इको फ्रेंडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -