घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार ०१ मार्च २०२४

राशीभविष्य : शुक्रवार ०१ मार्च २०२४

Subscribe

मेष – सामाजिक कार्यात तुम्हाला मोठेपणा मिळेल. घरातील वातावरणामुळे तुम्हाला उत्साह वाटेल. ध्येय पूर्ण होऊ शकेल. मुले खूश होतील.

वृषभ – कोर्टाच्या कामात नीट सल्ला घेऊन काम करा व मत व्यक्त करा. धंद्यात वाढ होईल. नोकरीची संधी मिळेल. कला क्षेत्रात यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन – सामाजिक स्तरावरील तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत यशस्वी व्हाल. नोकरीचा प्रश्न सुटेल.

कर्क – वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. नावलौकिक वाढेल. कला-क्रीडा साहित्यात नवीन ओळख होईल. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisement -

सिंह – सामाजिक कार्याची योजना पूर्ण करता येईल. जुना वाद मिटवता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. तब्येत उत्तम राहील.

कन्या – घरात कामे वाढतील. जबाबदारीने वागावे लागेल. स्वभावात चिडचिडेपणा आला तरीही यश मिळवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

तूळ – मनाची द्विधा अवस्था होईल. शांत राहा. दूरचा प्रवास करावा लागेल. विरोधक अडचणी आणतील. संयम बाळगा.

वृश्चिक – तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेता येईल. प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख होईल.

धनु – धंद्यातील, घरातील विस्कटलेली घडी नीट सावरता येईल. नवीन विषयात रस घ्याल. धंदा यश मिळेल. तब्येतीची काळजी घ्या.

मकर – महत्त्वाकांक्षा ठेवा. अहंभाव ठेवू नका. गुप्त कारवाया होतील. राग वाढू देऊ नका. शांततेत मार्ग काढा. धंद्यात नवे काम मिळेल.

कुंभ – रेंगाळत राहिलेली कामे करता येतील. घरात आनंदी वातावरण राहील. विचारांना प्रेरणा मिळेल. सामाजिक कार्यात यश मिळेल.

मीन – घरातील तणाव वाढवू नका. धंद्यात नवीन कामे मिळतील. नोकरीत अधिकारात वाढ होईल. विरोध सहन करावा लागेल. यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -