घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार ०८ मार्च २०२४

राशीभविष्य : शुक्रवार ०८ मार्च २०२४

Subscribe

मेष : दुसर्‍याच्या संकटात मदतीला जाल. कुटुंबात आनंदी घटना घडेल. व्यवसायात नवा फंडा लागू करता येईल.
वृषभ : नोकरीतील अपेक्षा पूर्ण होईल. आर्थिक उलाढालीत यश मिळेल. जुने मित्र भेटतील. कला-क्रीडा स्पर्धेत पुढे जाल.
मिथुन : मनाची चंचलता वाढेल. वाहन जपून चालवा. राग अनावर होईल. संयम बाळगा. खिसा सांभाळा. धंदा वाढेल.
कर्क : महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. घरातील सदस्यांसाठी मोठी खरेदी कराल. धंद्यात नवे काम मिळेल. कोर्टकेस जिंकाल.
सिंह : ठरविलेल्या कामाची वेळ पाळता येईल. जुने मित्र भेटण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक कार्यात यश मिळेल.
कन्या : गतिमान दिवस वाढेल. प्रयत्नाला फळ मिळाल्याचा आनंद मिळेल. नवीन परिचय होईल. कामात वरिष्ठ कौतुक करतील.
तूळ : घरातील समस्यांमुळे मनाची द्विधा अवस्था राहील. प्रकृतीची क्षुल्लक तक्रार राहील. रस्त्याने सांभाळून चाला.
वृश्चिक : महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा लवकर प्रयत्न करा. मौजमजेत वेळ घालवाल. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल.
धनु : नको असलेल्या व्यक्तीला टाळणे कठीण होईल. भावनेच्या आहारी जाण्यात वेळ फुकट जाईल. धंद्यात वाढ होईल.
मकर : दिवसभरात उपयुक्त, महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. पाहुणे येतील. दिवस मजेत जाईल. वरिष्ठांची मर्जी राखाल.
कुंभ : कामात वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. टीका होण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवा. संयम बाळगा.
मीन : सामाजिक कार्यात लोकांच्या अपेक्षा वाढतील. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करा. धंदा जोरात चालेल. यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -