घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार ०४ मार्च २०२४

राशीभविष्य : सोमवार ०४ मार्च २०२४

Subscribe

मेष – कामातील अडचणी कमी होतील. सहकारी मदत करतील. आत्मविश्वासच महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाची भेट करून घ्या.

वृषभ – धंद्यात नवे काम मिळेल. नोकरवर्गाच्या मागण्यांचा विचार करा. धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील. कायदा पाळा.

- Advertisement -

मिथुन – घरातील सदस्यांना नाराज करू नका. धंद्यात फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. कोर्टकेस लांबणीवर पडेल.

कर्क – कायदा मोडल्याचा आरोप होऊ शकतो. टीका होईल. हाणामारी कुठेही करू नका. शांततेतून मार्ग काढा. संयम बाळगा.

- Advertisement -

सिंह – मुलांची प्रगती सुखावह वाटेल. वाटाघाटी यशस्वी होतील. घर, वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. धंद्यात यश मिळेल.

कन्या – सामाजिक कार्यात मान-प्रतिष्ठा मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नवीन परिचय होईल. घरात आनंददायक घटना घडेल.

तूळ – चांगले केल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कठीण काम करून घेता येईल. गरजू लोकांना काम द्या. तब्येत उत्तम राहील.

वृश्चिक – धंद्यात मोठे काम मिळेल. नोकरवर्गाची काळजी घ्या. सामाजिक स्तरावर जास्त धोका पत्करू नका. प्रवासात नवीन परिचय होईल.

धनू – मनावर दडपण असले तरी कामे पूर्ण करता येतील. खाण्याची काळजी घ्या. तब्येत सांभाळा. कामात वरिष्ठांकडून कौतुक होईल.

मकर – राजकीय स्तरावर विरोध वाढेल. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जाईल. कायदा मोडू नका. कोर्टकेस यशस्वी होईल.

कुंभ – प्रगतीची संधी तुमच्या क्षेत्रात मिळेल. धंद्यात फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, नावलौकिक वाढेल. घरातून सहकार्य मिळेल.

मीन – सामाजिक कार्यासाठी महत्त्वाची चर्चा करता येईल. नोकरीत पदाधिकार मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. घरातील सदस्यांसाठी मोठी खरेदी कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -