घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ०२ मार्च २०२४

राशीभविष्य : शनिवार ०२ मार्च २०२४

Subscribe

मेष : तुमचा उत्साह वाढेल. नवे काम हाती घेता येईल. तुम्ही वेळेला नेहमीच महत्त्व देता हे उत्तम आहे. धंद्यात नवे काम मिळेल.

वृषभ : कामाची ठरविलेली वेळ पाळता येईल. नवीन ओळख होईल. वाटाघाटीत यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

- Advertisement -

मिथुन : घरातील सदस्यांचा गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांना खूश करता येईल. नोकरीत बढती मिळेल. धंदा मिळेल.

कर्क : घर, जमिनी संदर्भात तुमचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. अरेरावी करू नका. शांततेतून मार्ग निघेल. विचारपूर्वक वाहन चालवा.

- Advertisement -

सिंह : तुम्हाला तुमच्या समस्येवर आशेचा किरण दिसेल. कठोर मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. कमी बोला. राग आवरा.

कन्या : रेंगाळलेले काम गोड बोलून करून घ्या. वादाचा प्रसंग निर्माण होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळवाल.

तूळ : सामाजिक स्तरावर तुमच्या विचारांना चालना मिळेल. कला-क्रीडा साहित्यात चमकाल. नोकरी लागेल. धंदा वाढेल.

वृश्चिक : घरात क्षुल्लक तणाव वाढवू नका. संयमाने प्रश्न सोडवा. नवीन ओळखीमुळे तुमचा उत्साह वाढेल. कोर्टकेस लांबणीवर पडेल.

धनु : कामातील कठीण परिस्थिती सावरता येईल. प्रकृतीत सुधारणा होईल. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका. धंद्यात वाढ होईल.

मकर : नोकरवर्गामुळे धंद्यात मोठा फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. नवीन ओळख प्रेरणा देणारी ठरेल.

कुंभ : घरातील कठीण प्रसंगावर मात करता येईल. कामात मित्र, सहकारी मदत करतील. प्रकृती सुधारेल. वस्तू सापडेल. तणाव कमी होईल.

मीन : मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात जम बसेल. नोकरीत फायदा होईल. रागावर ताबा ठेवा. आवडत्या व्यक्तीसाठी खरेदी कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -