घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ०९ मार्च २०२४

राशीभविष्य : शनिवार ०९ मार्च २०२४

Subscribe

मेष : तुमच्या कार्याला गती मिळेल. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. घरातील वाटाघाटीची चर्चा सफल होईल.
वृषभ : तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. धंद्यात नवे काम मिळेल. कोर्टकेस लांबणीवर पडेल.
मिथुन : मनावरील दडपण कमी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन फंडा उपयोगात आणता येईल. पद, प्रतिष्ठा मिळेल.
कर्क : मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. जवळच्या व्यक्तीला तुमच्याकडून दुःख देण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवा.
सिंह : तुमचे डावपेच यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करता येईल. कल-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, नावलौकिक वाढेल.
कन्या : नोकरीतील कामासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करता येईल. विरुद्धलिंगी व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. धंद्यात यश मिळेल.
तूळ : योजना गतिमान बनेल. घरातील सदस्यांकडून शुभवार्ता समजेल. मैत्रीत वाढ होईल. धंद्यात नफा होईल. कोर्टकेस जिंकाल.
वृश्चिक : घरगुती कामावर खर्च करावा लागेल. कामात क्षुल्लक तणाव होईल. खिसापाकीट सांभाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या.
धनु : सामाजिक कार्यातील महत्त्वाच्या कामावर लक्ष देता येईल. प्रवासात नवा परिचय होईल. विचारपूर्वक निर्णय घेता येईल.
मकर : मैत्रीत वाढ होईल. नवे मित्र जोडले जातील. तुमचे बोलणे इतरांच्या वर्णी लागण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवा.
कुंभ : धंद्यात लाभ होईल. नोकरवर्गाला नाराज करू नका. नवीन गुंतवणूक करता येईल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील.
मीन : नात्यात गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाते तोडू नका. शांततेतून मार्ग काढा. धंद्यातील नफ्यासंबंधी चर्चा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -