राशीभविष्य: बुधवार ०९ नोव्हेंबर २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : किरकोळ अडचण कामात येईल. प्रकृतीची काळजी घ्या. थकवा वाटेल. मान-प्रतिष्ठा टिकेल. ओळखी होतील.

वृषभ : महत्त्वाचे काम करा. पाहुण्यांचे स्वागत कराल. योजनांना गती देता येईल. सौम्य शब्द वापरा.

मिथुन : नोकरीत बदलीची शक्यता निर्माण होईल. नवे मित्र मिळतील. वरिष्ठांच्या मर्जीचा विचार करा.

कर्क : रेंगाळत राहिलेले कामे करा. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळवा. वसुली करा.

सिंह : मित्र, जवळचे लोक मदत मागण्यास येतील. तुमच्यावर दबाव येईल. मन अस्थिर होईल. आठवणी येतील.

कन्या : आज ठरविलेले काम वेळेत पूर्ण होईल. काटेकोरपणे बोलणे टाळा. कोर्टकेस जिंकाल. प्रतिष्ठा मिळेल.

तूळ : ठरवाल एक पण करावे लागेल दुसरेच. नाराज होऊ नका. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील.

वृश्चिक : तुमचा विचार पक्का करता येईल. खर्च वाढेल. नवा परिचय होईल. धंद्यात वाढ करा. वसुली करा.

धनु : वाद होईल. त्याला महत्व देऊ नका. धंद्यात वाढ होईल. आवडते पदार्थ मिळतील. खरेदी कराल.

मकर : तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. कला क्षेत्रात प्रगतीकारक स्पर्धा जिंकाल. प्रभाव पडेल.

कुंभ : आप्तेष्ठांच्या मर्जीचा विचार कराल. नोकरीत काम वाढेल. इतरांना मदत करावी लागेल.

मीन : मनाची अस्थिरता कमी होईल. प्रतिष्ठा मिळेल. मैत्री वाढेल. गैरसमज दूर होईल. धंदा वाढेल.