आजचे राशीभविष्य : गुरुवार २४ जानेवारी २०१९

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य
मेष :- ठरविलेल्या कार्यक्रमात अचानक बदल करण्याची वेळ येऊ शकते. संतापजनक घटना घडू शकते. धंद्यात वाद होईल.
वृषभ :- कठीण काम करण्याचा प्रयत्न करा. यश मिळे. नवीन ओळखीचा उपयोग होऊ शकतो. पाहुणे येतील.
मिथुन :- किरकोळ अडचणी येतील. जेवण वेळेवर करा. कुटुंबात गैरसमज होऊ शकतो. धंद्यात लक्ष द्या.
कर्क :- शुभ समाचार मिळेल. काम करण्याचा उत्साह व आत्मविश्वास वाटेल. भेट घेण्यास व चर्चा करण्यात यश मिळेल.
सिंह :- महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसायात फायदा होईल. नवा विचार सुचेल.
कन्या :- मनाची द्विधा अवस्था होईल. संशयास्पद विचार करून मनाला त्रास देऊ नका. मार्ग शेवटी मिळेल.
तूळ :- प्रसंगानुसार वागावे लागेल. पूर्व नियोजित कार्यक्रम पूर्ण होईल असे समजू नका. तटस्थ भूमिका घ्या.
वृश्चिक :- जास्त अपेक्षा ठेऊ नका. चौफेर विचार केल्यानेच मार्ग सापडतो. धंद्यात लक्ष द्या. नवे काम मिळेल.
धनु :- दुसऱ्यला मिळालेल्या यशाचे कौतुक आपण केल्यास समोरच्याला उत्साह येतो. मिसळून वागा. ताण कमी होईल.
मकर :- धंद्यात लक्ष द्या. थोडी वाट पहा, ताण कमी होईल. मदत मिळेल. स्पर्धा आकर्षक होईल. प्रकृती सुधारेल
कुंभ :- मन उदास राहील. अचानक परिस्थिती बदलल्यामुळे विचारांचा गोंधळ होईल. थकवा वाटेल. महत्त्वाची वस्तू सांभाळा
मीन :- किरकोळ वाद वाढवू नका. समस्या कमी होईल. धंध्यात वाढ होईल. नवा परिचय उपयुक्त ठरेल.