घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य रविवार २३ ऑक्टोबर ते शनिवार २९ ऑक्टोबर २०२२

राशीभविष्य रविवार २३ ऑक्टोबर ते शनिवार २९ ऑक्टोबर २०२२

Subscribe

मेष ः- वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. मन अस्थिर होईल. रागावर ताबा ठेवा. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेरपूजन ते भाऊबीज मनाप्रमाणे साजरी कराल. दिवाळी पाडव्यानिमित्त नव्या कार्याचा आरंभ करता येईल. धंद्यात वाढ होईल. नोकरमाणसे सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात वाटाघाटीमध्ये नाराजी होईल. घरातील व्यक्तींमध्ये मतभेद होतील. हे सर्व तात्पुरते असेल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. प्रवासाचा बेत आखाल. काम यशस्वी होईल. व्यसन करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. २३, २५

वृषभ ः या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, चंद्र गुरू युती होत आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन मनोभावे होईल. दिवाळी पाडवा, भाऊबीज दिवशी मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. प्रवासात दगदग होईल. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. पद मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. नोकरीत सावधपणे काम करा. कामात दिशाभूल होईल. मोह आवरा. शिक्षणात प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. पोटाची काळजी घ्या. कोणतेही व्यसन करू नका. शुभ दि. २४, २६

- Advertisement -

मिथुन ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. दिवाळी आनंदात साजरी कराल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेरपूजन ते भाऊबीज, दिवाळी पाडवा उत्साहाचा असेल. मंगळवारी प्रवासात सावध रहा. वस्तू सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. पदाच्या संबंधी समस्या निर्माण होऊ शकते. धंद्यात नवे काम मिळेल. कामगारांची भूमिका समजून घ्यावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. नवीन ओळख होईल. काम यशस्वी कराल. शिक्षणात धरसोड वृत्ती ठेऊ नका. मैत्री योग्य व्यक्तीशी करा. शुभ दि. २५, २७

कर्क ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, बुध शुक्र युती होत आहे. दिवाळी आनंदाची असेल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजनात मनोभावे लक्ष राहील. दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी नव्या कार्याचा आरंभ करता येईल. घर, जमीन घेण्याचा विचार कराल. धंद्यात मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. लोकांचे सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या शेवटी चूक करू नका. नोकरीत काम वाढेल. काम यशस्वीपणे पूर्ण कराल. शिक्षणात पुढे जाल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखीमुळे फायदा होईल. शुभ दि. २६, २८

- Advertisement -

सिंह ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. दिवाळी महत्त्वाची ठरेल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन ते भाऊबीज, दिवाळी पाडवा उत्साहात साजरा कराल. भाऊबीज विशेष आनंदाची ठरेल. संध्याकाळी प्रवासात सावध रहा. धंद्यात वाद वाढवू नका. मोठे काम मिळवता येईल. अरेरावी करू नका. नोकरांना दुखवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. पदाची शक्यता वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळख उत्साहाची ठरेल. मोह टाळा. कामात यश मिळेल. शिक्षणात पुढे जाल. फटाके वाजवताना डोळ्यांची काळजी घ्या.
शुभ दि. २७, २९

कन्या ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट मिळवता येईल. दिवाळी उत्साहात साजरी कराल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन ते भाऊबीज, दिवाळी पाडवा या सर्व दिवसांचा आनंद घेता येईल. फटाक्यांपासून सावध राहा. नव्या कामाची सुरुवात करता येईल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. घर, दुकान घेण्याचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीचा प्रयत्न करा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. प्रवासाचा बेत आखाल. मोहिमेत यशस्वी व्हाल. शिक्षणात प्रगती कराल.
शुभ दि. २३, २४

तूळ ः- या सप्ताहात वृश्चिकेत येणारा शुक्र तुमच्या कार्यात विशेष यश देणार आहे. चंद्र गुरू युती होत आहे. व्यवसायात जम बसेल. मोठे काम मिळेल. शेअर्समधील नुकसान भरून काढता येईल. दिवाळी आत्मविश्वासाची आनंदी ठरेल. नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. मनाचा गोंधळ होईल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन मनोभावे कराल. दिवाळी पाडवा, भाऊबीज विशेष ठरेल. शुभ समाचार मिळेल. नव्या कार्याचा आरंभ करता येईल. वाहन, घर खरेदी कराल. प्रवासाचा बेत आखाल. तब्येत उत्तम राहील. राजकीय-सामाजिक कार्याला दिशा मिळेल. पदाधिकार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कामात कसोटी लागेल. शिक्षणात पुढे जाल. शुभ दि. २४, २५

वृश्चिक ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, चंद्र गुरू युती होत आहे. धंद्यातील स्थिती सुधारता येईल. तणाव कमी होऊन नवे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल. दिवाळीचा आनंद घ्याल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन मनाप्रमाणे साजरे कराल. दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी तुमचे मन अस्थिर राहील. प्रवासात घाई करू नका. वाहन जपून चालवा. तब्येतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. पदाधिकार मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. कामात वरिष्ठांची मदत मिळेल. शिक्षणात आळस करू नये. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. २६, २७

धनु ः- या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. दिवाळी यथासांग साजरी कराल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन ते भाऊबीज उत्साहात साजरी कराल. दगदग होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व टिकून राहील. वाटाघाटी, पद मिळणेसाठी जवळचे लोक काड्या घालतील. नोकरीत परदेशात जाण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा. शोध मोहिमेत धावपळ होईल, परंतु यश मिळेल. शिक्षणात चांगली संगत ठेवा. वेळेला महत्त्व द्या. दि. २७, २८

मकर ः- या सप्ताहात शुक्र वृश्चिकेत येत आहे. सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. दिवाळी तुम्ही आनंदात साजरी कराल. नरक चतुर्दशी, भाऊबीज, दिवाळी पाडवा उत्साहात, आनंदात जाईल. लक्ष्मी-कुबेर पूजन मनोभावे कराल. तुमचा उत्साह वाढेल. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनतीचे फळ मिळेल. पदाधिकार मिळेल. लोकांच्या प्रेमाने भारावून जाल. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात ध्येयावर लक्ष ठेवा. चांगले मित्र जवळ करा. शुभ दि. २८, २९

कुंभ ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या दिवशी मन अस्थिर होईल. भाऊबीज, दिवाळी पाडवा या दिवशी उत्साह राहील. काम करताना सावध रहा. किरकोळ दुखापत संभवते. फटाके तर वाजवणे ठीक नाही. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तब्येत उत्तम राहील. लोकांच्या सहकार्याने प्रगती कराल. नोकरीत बदल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळख होईल. शोध मोहिमेत यशस्वी व्हाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शिक्षणात धरसोड वृत्ती ठेऊ नका. शुभ दि. २४, २७

मीन ः- या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, चंद्र गुरू युती होत आहे. दिवाळी आनंदात साजरी कराल. नरक चतुर्दशी, लक्ष्म-कुबेर पूजन मनाप्रमाणे साजरे कराल. दिवाळी पाडवा, भाऊबीज उत्साहात साजरी कराल. दिवाळी पाडवा, भाऊबीजेच्या दिवशी समाधानकारक घटना घडेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. घरात वाद वाढवू नका. धंद्यातील समस्या कमी होईल. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत घ्या. कामात दगदग होईल. दिशाभूल होऊ शकते. शिक्षणात स्थिर रहा.
दि. २५,२८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -