राशीभविष्य रविवार ६ फेब्रुवारी ते शनिवार १२ फेब्रुवारी २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- रविवार भेट घेण्यात यश मिळेल. धंद्यात फायदा होईल. सामाजिक कार्यात मान-प्रतिष्ठा वाढेल. शुक्र हर्षल षडाष्टक योग, चंद्र बुध लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. प्रतिष्ठा वाटेल असे कार्य करा. लोकांचा विश्वास जिंका. उद्योग-धंद्यात कंत्राट मिळेल. भागिदाराकडे लक्ष ठेवा. फसगत होणार नाही ते पहा. घरातील व्यक्तींना कमी समजू नका. प्रेमाने प्रश्न सोडवा. मुलांच्या समस्या समजून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. संशोधनाच्या कामात कौतुक होईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. शुभ दि. ७, ८

वृषभ ः- रविवार धंद्यात गिर्‍हाईकाबरोबर वाद होईल. पाहुण्यांसाठी वेळ व पैसा खर्च करावा लागेल. बुध, मंगळ, केंद्र योग चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांना दुखवू नका. सरकारी वर्गाला प्रेमाने वागवा. धंद्यात हिशोब नीट करा. सौम्य शब्दांत नोकरांची चूक दाखवा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. तुमचे मन स्थिर ठेवता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत थोडी मेहनत कमी पडेल. घरातील वाद मिटवता येईल. वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कोर्ट केसमध्ये अडचण येईल. संशोधनाच्या कामात अरेरावी करू नका. विद्यार्थी वर्गाने शिस्तीत अभ्यास करावा. शुभ दि. ८, ९

मिथुन ः- रविवार महत्वाची भेट घ्या. काम पूर्ण करा. धंद्यात फायदा होईल. काम देण्याचे आश्वासन मिळेल. चंद्र, बुध लाभयोग. तुमच्या उद्योग धंद्यात चांगली सुधारणा घडवू शकेल. प्रयत्न करा. फायदा पाळा. सूर्य, चंद्र लाभ योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात चूक सुधारून प्रगतीकारक योजना हाती घेता येईल. आळसात वेळ घालवू नका. मोहाला बळी पडू नका. नोकरीत वर्चस्व राहील. कला-क्रीडा क्षेत्रात जिद्दीने पुढे जाल. कोर्ट केस सोपी नाही, प्रयत्न करा. संशोधनात प्रेमाने सहकारी वर्गाबरोबर रहा. प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी चांगला आहार घ्यावा. परीक्षेसाठी तयारी करावी. शुभ दि. १०, ११

कर्क ः- रविवार सामाजिक कार्यात अरेरावी करून बोलू नका. धंद्यात आळस करू नका. कायदा पाळा. बुध, मंगळ, केंद्र योग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात, नोकरीत कमी पडू शकतात. नम्रतेने राजकीय-सामाजिक कार्यात वागा. बोलताना चूक होऊ शकते. सप्ताहाच्या मध्यावर तणाव वाढू शकतो. नोकरीत वरिष्ठांचा धाक नकोसा वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमची कल्पनाशक्ती फारशी प्रभावी ठरेलच असे समजू नका. घरात शुभ वार्ता समजेल. कोर्ट केसमध्ये दादागिरी चालणार नाही. प्रतिष्ठा बिघडेल. संशोधनाच्या कामात मेहनत जास्त होईल. विद्यार्थी वर्गाने वाहन जपून चालवावे. शुभ दि. ८, १२

सिंह ः- रविवार महत्वाचे काम करून घ्या. वरिष्ठांच्या संमतीने सामाजिक कार्यात सुधारणा करता येईल. धंदा वाढेल. चंद्र बुध लाभयोग, सूर्य प्लुटो युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कटकटी झाल्या तरी नंतर राजकीय-सामाजिक कार्य नीट पूर्ण करता येईल. तुमच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतील. धंद्यात मोठे काम मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. घरात किरकोळ वाद जीवनसाथी, मुले यांच्याशी होईल. मनाचा कोंडमारा होईल. कोर्ट केसमध्ये चिंता वाटली तरी सहाय्य घेता येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. वाहनाचा वेग कमी ठेवावा. शुभ दि. 10,11

कन्या ः- रविवार धंद्यात किरकोळ समस्या येईल. धंदा वाढेल. नवी ओळख होईल. नातलगांची भेट घडेल. चंद्र शुक्र लाभयोग, सूर्य प्लुटो युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर राजकीय-सामाजिक कार्यात अडचण येईल. वादाचा मुद्दा निर्माण होईल. धंद्यात मोठ्या लोकांच्या आशीर्वादाने काम मिळेल. तुम्ही नम्रता ठेवा. वर्चस्व कुठेही न दाखवता लोकांचे सहकार्य मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक खूप होईल. कामात मोठे आश्वासन मिळेल. कोर्ट केसमध्ये बोलताना सावध रहा. संशोधनाच्या कामात युक्ती उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गाने परीक्षेसाठी नियमितपणाने अभ्यास करावा. वाहन हळू चालवावे. शुभ दि. ७, १२

तुला ः- रविवार महत्वाचा निर्णय घेता येईल. उत्साहाच्या भरात कठीण असलेले काम करून जाल. धंद्यात फायदा होईल. चंद्र, बुध, लाभयोग, सूर्य प्लुटो युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना गती मिळेल. वरिष्ठ तुमची बाजू मांडतील. अधिकार मिळेल. उद्योग-धंद्यात प्रगती करता येईल. भागीदार मिळतील. शेअर्समध्ये फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. कोर्टाच्या कामात यश येईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. संशोधनात तुमच्या कामाचे कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाने संधीचा फायदा घ्यावा. ग्रहांची साथ आहे. अभ्यास करून मोठे यश मिळवावे. शुभ दि. 7,10

वृश्चिक ः- रविवार तुमचा उत्साह वाढेल. मोठ्या लोकांची ओळख होईल. धंद्यात वाढ होईल. स्पर्धेत यश मिळेल. बुध मंगळ केंद्र योग, सूर्य प्लुटो युती होत आहे. धंद्यात भावना आणू नका. मेहनत घ्या. व्यवहार नीट सांभाळा. नवे काम शोधा. राजकीय-सामाजिक कार्यात नेटाने काम करावे लागेल. गुप्त कारवायांना थोपवता येईल. घरातील व्यक्तीसाठी वेळ, पैसा खर्च करावा लागेल. त्यांची नाराजी होऊ शकते. कोर्ट केसमध्ये मार्ग शोधता येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. मैत्रीत वाद संभवतो. विद्यार्थ्यांनी पास होण्यासाठी अभ्यास करावा. शुभ दि. १०, ११

धनु ः- रविवार आळस न करता ठरविलेले काम करा. खाण्याची काळजी घ्या. चांगली संगत ठेवा. वस्तू सांभाळा. उत्साह कायम ठेवा. सूर्य प्लुटो, युती, शुक्र हर्षल षडाष्टक योग होत आहे. घरात कुणीतरी गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही माणूस ओळखा. राग करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांकडे दुर्लक्ष करू नका. धंद्यात काम मिळवा. मैत्रीत व्यवहार टाळा. कला-क्रीडा क्षेत्रात चौफेर लक्ष द्या. मेहनत घ्या. संशोधनाच्या कामात स्वतः मेहनत घ्या. वरिष्ठ कौतुक करतील. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवावी. अभ्यासात आळस करू नये. वाहन जपून चालवा. शुभ. १०, ११

मकर ः- रविवार धावाधाव होऊ शकते. सामाजिक कार्यात तणाव संभवतो. धंद्यात वाद न करता गोड बोला. चंद्र, गुरू लाभ योग, बुध मंगळ केंद्र योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची धावपळ होईल. तुमचे मांडलेले मुद्दे वादग्रस्त ठरू शकतात. तुमच्यावर आरोप होईल. धंद्यात कामगारांना फटकारू नका. त्यांची अडचण समजून घ्या. काम मिळवण्यात विलंब होऊ शकतो. घरातील व्यक्तींना खूश कराल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. पूर्ण यश सोपे नाही. कोर्ट केसमध्ये तुमचे बोलणे विरोधकांना झोंबणार आहे. संशोधनात पुढे जाल. विद्यार्थ्यांनी नम्रपणे वागावे. शुभ दि. ११, १२

कुंभ ः- रविवार तुमचा अंदाज बरोबर येईल. तुमचा उत्साह वाढेल. धंद्यात फायदा होईल. महत्वाच्या कामाची सुरुवात करता येईल. चंद्र शुक्र लाभयोग, सूर्य प्लुटो युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे कामास प्रसिद्धी मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गुप्त कारवायांचा त्रास होईल. मोठे कंत्राट मिळवा. घरात शुभकार्याची तयारी कराल. तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. नवीन परिचय होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मोठ्या प्रमाणात वाढेल. कोर्ट केस जिंकाल. संशोधनात प्रभाव पडेल. वरिष्ठ कौतुक करतील. नोकरी लागेल. विद्यार्थ्यांना घेतलेले परिश्रम उपयोगी पडतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. ११, १२

मीन ः- रविवार तुम्ही ठरविलेले काम पूर्ण होईल. धंद्यात फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत चमकाल. चंद्र गुरु, लाभ, सूर्य प्लुटो युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांच्या बरोबर चांगले संबंध वाढतील. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ वाद होतील. धंद्यात चांगली सुधारणा करू शकाल. प्रवासात सावध रहा. घरात मोठी खरेदी कराल. घर, जमीन संबंधी काम करून घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. कोर्ट केस मार्गी लागेल. संशोधनात तुमचा अंदाज योग्य ठरेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नवे मित्र मिळतील. अभ्यासात कमी पडू नका. नोकरीत चांगला बदल करता येईल. शुभ दि. ७, ८