घरताज्या घडामोडीनिवडणुकांसाठी नव्हे तर मुंबईकरांसाठी चांगली कामे करुन दाखवतो, आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

निवडणुकांसाठी नव्हे तर मुंबईकरांसाठी चांगली कामे करुन दाखवतो, आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

Subscribe

महापालिका शाळांमध्ये सुद्धा प्रवेशासाठी रांग लागली पाहिजे हे जे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसून येत आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आगामी निवडणुका आहेत म्हणून आम्ही कामे करीत नसून आम्हाला जे काही मुंबईकरांना चांगले द्यायचे आहे ते आम्ही करून दाखवित असतो. त्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो, या शब्दात राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता भाजपला सुनावले आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यातर्फे दादर,भवानी शंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी जोगेश्वरी (पश्चिम ) च्या प्रतिक्षानगर येथील मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण, जोगेश्वरी (पूर्व) च्या पूनमनगर येथील मुंबई पब्लिक स्कूल मधील बास्केटबॉल कोर्टचे उद्घघाटन, दादर (पश्चिम) च्या भवानीशंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या डिजिटल क्लासरुमचे उद्घघाटन व महापालिका शाळेतील दहावी मधील सर्वोत्तम पंचवीस गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप प्रदान करण्याचा कार्यक्रम तसेच वरळी सी फेस येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील खगोलशास्त्र लॅबचे उद्घघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या विद्यार्थी पटसंख्येत यावर्षी २९ हजारांनी झालेली वाढ हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे प्रतिपादन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. महापालिका शाळांमध्ये सुद्धा प्रवेशासाठी रांग लागली पाहिजे हे जे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसून येत आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

कोविड -१९ मुळे दोन वर्षापासून आपण सर्वजण ऑनलाइन शिक्षण घेत होतो. मुंबईकरांची जी काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देश, समाज नागरिकाला पुढे नेण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. दंतचिकित्सा, मानसिक आरोग्य, करियर कौन्सिल, व्हर्च्युअल क्लासरूम या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे हे प्रत्येक मुंबईकरांना वाटले पाहिजे या हेतूने आम्ही सर्वजण काम करीत आहोत. या दृष्टिकोनातून या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी अतिरिक्त ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : ‘सोमय्या घाबरणार नाहीत’ जशास तसे उत्तर देऊ, शिवसैनिकांच्या राड्यावर चंद्रकांत पाटलांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -