घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य: रविवार ८ ऑक्टोबर ते शनिवार १४ ऑक्टोबर २०२३

राशीभविष्य: रविवार ८ ऑक्टोबर ते शनिवार १४ ऑक्टोबर २०२३

Subscribe

मेष ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नोकरवर्गाला कडक शब्दात बोलू नका. मागील वसुली करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. राजकीय-सामाजिक कार्यात यश मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान मिळेल. पूर्वी केलेल्या चुका सुधारण्याची तयारी ठेवा. संसारातील तणाव कमी होईल. वाटाघाटीत चर्चा सफल करू शकाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मिळेल. शोध मोहिमेत यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला कठीण प्रसंगावर मात करता येईल. बोलताना काळजी घ्या. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. शुभ दि. ८, १२

वृषभ ः या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळवण्यासाठी दादागिरी करून चालणार नाही. तुमची फसगत होऊ देऊ नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कायद्याचे पालन करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये. राजकीय-सामाजिक कार्यात मनावर दडपण येईल. लोकांची नाराजी सहन करावी लागेल. संसारात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. घरातील खरेदी करताना खिसा, पाकीट सांभाळा. खर्च जास्त होऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी थांबावे लागेल. शोध कार्यात कष्ट पडतील. जिद्दीने यश मिळेल. शिक्षणात आळस करू नये. शुभ दि. ९, १३

- Advertisement -

मिथुन ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश होत आहे. सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात गोड बोला. ग्राहकाला समजून घ्या. फायदा वाढेल. नोकरीतील ताण कमी होईल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व लोकांना वाटेल. त्यामुळे यश मिळवाल. घरातील खरेदी मनाप्रमाणे कराल. प्रवासाचा बेत आखाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोधमोहीम यशस्वी करताना वरिष्ठांना मान द्या. कोर्टाची कामे मार्गी लागतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या. तुमचे महत्त्व वाढेल. शिक्षणात यश मिळेल. वेळेवर अभ्यास करा. शुभ दि. १०, १४

कर्क ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, गुुरू त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळवता येईल. ओळखीचा उपयोग करून घ्या. मागील येणे वसूल करा. नोकरीत कामाचा व्याप सहन करावा लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात अरेरावी नको. मन अस्थिर होईल. यश मिळवणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. कला-क्रीडा क्षेत्रात अत्मविश्वासाने पुढे जाल. नवीन परिचय होईल. प्रेमाला चालना मिळेल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात आळस नको. घरातील व्यक्तींसाठी मनासारखी खरेदी कराल. कठीण कामे आताच करून घ्या. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. शुभ दि. ८, ११

- Advertisement -

सिंह ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळेल. वादविवाद जास्त वाढवू नका. मैत्रीचा उपयोग होईल. नोकरी लागेल. प्रयत्न करा. नवा बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर दबाव असला तरी यश खेचून आणता येईल. जिद्द ठेवा. मेहनत घ्या. बोलण्यात सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संसारात मुलांची प्रगती होईल. नातेवाईक, आप्तस्वकियांसाठी मनाप्रमाणे वस्तू खरेदी कराल. नोकरीत सहकारी मदत करतील. कठोर बोलणे टाळा. शिक्षणात पुढे जाल. चांगली संगत ठेवा. शुभ दि. ९, १२

कन्या ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. नवे काम मिळेल. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक आत्ताच करून ठेवा. नोकरीत चांगला बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. राग अनावर होणारी घटना सप्ताहाच्या मध्यावर घडू शकते. वाहन जपून चालवा. संसारात मुलांची मदत मिळेल. मुले प्रगती करतील. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात नाव मोठे होईल. नवीन लोक मदत करतील. ओळख वाढेल. अविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. शोध मोहीम यशस्वी होईल. शुभ दि. १०, १३

तूळ ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, शुक्र, शनि लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवा. ग्रहांची साथ आहे तोपर्यंत माणसाने जास्त मेहनत घ्यावी. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. शेअर्समध्ये फायदा होईल. येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्व दिले जाईल. लोकांचे सहकार्य मिळेल. संसारात सुखद संवाद होईल. रस्त्याने चालताना काळजी घ्या. व्यसनी लोकांच्या नादी लागू नका. रागावर ताबा ठेवा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवी संधी मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. शोध मोहीम यशस्वी होईल. शिक्षणात प्रगती कराल. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दि. ११, १४

वृश्चिक ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तडजोड स्वीकारावी लागेल. जुनी मैत्री तोडू नका. नवे काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक करू नका. कायदा पाळा. आरोप येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मनावर दडपण येईल. विरोधक शह देण्याचा प्रयत्न जोरदार करतील. संसारात कामे वाढतील. चिडचिड होऊ शकते. खरेदी करताना उतावळेपणा नको. पाकीट सांभाळा. खर्च जास्त होईल. प्रवासात सावध रहा. शोध मोहीम यशस्वी करण्याची जिद्द ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रभाव पडेल. स्पर्धा कठीण होईल. शिक्षणात आळस नको. शुभ दि. ८, १०

धनु ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात काम मिळवण्याचा प्रयत्न करा. कोणतीही चर्चा करताना बोलणे सावधपणे करा. क्षुल्लक गैरसमज होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव दिसेल. लोकांचे सहकार्य मिळेल. छोट्या व्यक्तींना कमी लेखू नका. संसारात सुखद घटना घडेल. मनाप्रमाणे वस्तू मिळतील. कोणतेही व्यसन करू नका. शोध मोहिमेत दगदग झाली तरी यशस्वी व्हाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शिक्षणात पुढे जाल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. शुभ दि. ९, ११

मकर ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात जम बसेल. प्रयत्न करा. आत्ताच काही समस्या सोडवल्या जातील. नोकरीत परदेशात जाण्याचा योग येऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्या. यश मिळवाल. बुद्धि, शक्तीचा योग्य तो वापर करा. संसारात मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नवीन परिचय कला-क्रीडा क्षेत्रात होतील. प्रतिष्ठा मिळेल. चौफेर सावध रहा. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. शोध मोहीम महत्त्वाची ठरेल. शिक्षणात यश मिळेल. शिक्षणात धरसोड वृत्ती ठेवू नका. चांगली संगत ठेवा. शुभ दि. १०, १२

कुंभ ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. विरोध मोडून काढता येईल. तुम्ही रागावर ताबा ठेवा म्हणजे तुमचे महत्त्व अधिक राहील. नोकरीतील तणाव कमी होईल. प्रवासाचा बात आखाल. प्रवासात घाई करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे स्थान पक्के राहील. प्रयत्नात कसूर करू नका. प्रेमानेच माणसे जोडली जातात. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. घरात वस्तू खरेदी करण्याचा उत्साह राहील. मनाप्रमाणे वस्तू मिळेल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात चांगले यश मिळेल. नोकरी लागेल. कोर्टाची कामे यशस्वी होतील. शुभ दि. ११, १३

मीन ः- या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात काम मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. गोड बोला. व्यवहारात भावनांचा गुंता करू नका. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात कोणतीही चूक करू नका. कायदा पाळा. लोकांचा, वरिष्ठांचा रोष होणार नाही याकडे लक्ष द्या. जीवनसाथी, मुले यांच्याबरोबर मतभेद होईल. सामोपचाराने मतभेद सोडवा. बाजारात खरेदी करताना खिसा-पाकीट सांभाळा. अनाठाई खर्च टाळावा लागेल. नोकरीत कामात चूक होऊ शकते. शोध मोहिमेत धावपळ होईल. शिक्षणात मागे राहू नका. चांगली संगत ठेवा. शुभ दि. १२, १४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -