घरICC WC 2023IND vs PAK : भारताने पाकिस्तानला 191 धावांत गुंडाळले; 36 धावांत गमावल्या 7 विकेट

IND vs PAK : भारताने पाकिस्तानला 191 धावांत गुंडाळले; 36 धावांत गमावल्या 7 विकेट

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेत (ICC Cricket World Cup 2023) आज (14 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महामुकाबला होत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पाकिस्तान संघाने आपल्या 3 विकेट गमावत 155 धावांपर्यंत मजल मारली, मात्र त्यानंतर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. थोड्या थोड्या अंतराने विकेट पडल्यामुळे पाकि्स्तान संघाने अवघ्या 36 धावांत आपल्या 7 विकेट गमावल्या. (IND vs PAK India bowled out Pakistan by 191 runs 7 wickets lost for 36 runs)

भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. अब्दुल्ला शफीक आणि इमाम-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अब्दुलल्ला शफीक 20 धावांवर बाद झाल्यानंतर इमान-उल-हकही 36 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागिदारी केली. मात्र बाबर आझम 58 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 50 धावा करून बाद झाला. यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरश: गुडघे टेकले. पाकिस्तानने 36 धावांवर आपल्या 7 विकेट गमावल्या.

- Advertisement -

बाबर आझम बाद झाल्यानंतर सौद शकील (6), इफ्तिखार अहमद (4) आणि मोहम्मद रिझवान (69 चेंडूंत 49) बाद झाला. तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. यानंतर शादाब खान (2), मोहम्मद नवाज (4), हसन अली (12) आणि हरिस रौफ (2) धावा करून बाद झाले. त्यामुळे पाकिस्तान संघ 42.5 षटकात 191 धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -