घरलाईफस्टाईलआकर्षक दिसणार्‍या स्ट्रॉबेरीचे फायदे

आकर्षक दिसणार्‍या स्ट्रॉबेरीचे फायदे

Subscribe

महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचे उत्पादनआणि उत्पन्न घेतले जाते. सध्या स्ट्रॉबेरीचा हंगाम असून बाजारात सहज स्ट्रॉबेरी हे फळ उपलब्ध आहे. स्ट्रॉबेरीचा उपयोग आईस्क्रीम, मिल्कशेक, चॉकलेट्स आणि फ्रुट जॅम बनवण्यास केला जातो. स्ट्रॉबेरी हे दिसायला जरी लहान फळ असलं तरी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्याने स्ट्रॉबेरीच्या हंगामात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने मेंदूची क्षमता वाढते. हे फळ इतर आजारांवरही उपयुक्त ठरते. लाल आणि दिसायला फक्त स्ट्रॉबेरी हे फळ आकर्षक नसून त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

हृदयविकार आणि मधुमेहावर मात करण्यास स्ट्रॉबेरीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

- Advertisement -

सायट्रीक आम्ल आणि इतर आरोग्यास आवश्यक आम्ल स्ट्रॉबेरीमध्ये असल्याने दात चमकदार होतात आणि हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.

सांधेदुखीपासून देखील स्ट्रॉबेरी दिलासा देते. यातील अँटीऑक्सीडंटस आणि फायटोकेमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीमधील पोटॅशिअम उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते.

- Advertisement -

स्ट्रॉबेरीमध्ये असणार्‍या मॅगेनिज या खनिजद्रव्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन सांधेदुखीपासून दिलासा मिळतो.
स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व असल्याने दिवसभर कामामुळे येणारा थकवा नाहीसा होतो. या फळातील ऑक्साईड प्रतिकारक असल्यानं डोळ्यांसाठी स्ट्रॉबेरी लाभदायक ठरते. ज्यामुळे मोतीबिंदू होण्यापासून संरक्षण होते. स्ट्रॉबेरीतील ‘क’जीवनसत्त्वामुळे डोळ्यांना प्रकशापासून दिलासा मिळतो.

स्ट्रॉबेरीमध्ये पोटॅशिअम हे द्रव्य मुबलक असल्याने हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत होते. तसेच, स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणार्‍या पेशी नष्ट करतात.

तांबड्या रक्तपेशींच्या अभावाने महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण आपल्याकडे मोठे आहे. स्ट्रॉबेरीमधील फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात. यातील ‘क’ जीवनसत्व त्वचेवर पडणार्‍या सुरकुत्या कमी करते. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -