Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल प्रेमासाठी कायपण,ब्वॉयफ्रेंडला ठेवलं प्रोबेशनवर

प्रेमासाठी कायपण,ब्वॉयफ्रेंडला ठेवलं प्रोबेशनवर

लॉकडाऊनमुळे बहरले प्रेम

Related Story

- Advertisement -

युकेच्या एका महिलेने लॉकडाऊमधील कालावधी कसा घालवला याबाबत एका रिलेशनशिप पोर्टलवर माहिती सांगितली आहे. लॉकडाऊनचा फायदा या तरुणीने आपल्या प्रियकराची परीक्षा घेण्यासाठी वापरला असल्याचे तिने म्हटले आहे. या तरुणीने सांगितले की, काही वर्षांपुर्वी तिची आणि जॉर्जची टिंडरवर भेट झाली होती. त्यावेळी ती १६ वर्षांची होती तर तसेच ६ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. लॉकडाऊन नंतर त्यांच्यातील नाते अधिक घनिष्ठ झाले असल्याचे तिने सांगितले आहे. यामील कारणही खास असून तिने हे कारणही सांगितले आहे. आपण एखादी वस्तू घेण्यापूर्वी ती कशी चालते याबाबत माहिती करुन घेतो अशाच प्रकारे या तरुणीने ट्रायल घेतले आहे.

या तरुणीने म्हटले आहे की, प्रेम सुरु झाले तेव्हा टीनएज रोमांसमध्ये आम्ही दोघेही एकमेकांपासून दूर होतो. यानंतर इंजिनियरिंच्या शिक्षणासाठी जॉर्ज स्टैफोर्डशायर गेला यानंतर २ वर्षांनी माझ्या पुढील शिक्षणासाठी मैंचेस्टर गेले. आमच्या दोघांसाठीही हे कठीण होते. परंतु सुट्टी असताना आम्ही एकमेकांना भेटत होतोत. जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा मित्रांसोबत बाहेर जायचो असे या तरुणीने म्हटले आहे.

- Advertisement -

तरुणीने पुढे सांगितले की, २०१९ मध्ये जॉर्जला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली त्यामुळे त्याला सतत प्रावस करावा लागत होता. आमच्यातील आंतर वाढायला लागले. भेटी-गाठीही कमी झाल्या परंतु आमचे प्रेम कमी होऊ दिले नाही. काही कालावधीनंतर मीही पार्ट टाइम काम करायला सुरुवात केली असे या तरुणीने सांगितले.

मार्चमध्ये कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन होणार होता. मी जॉर्जला भेटण्यासाठी मैंचेस्टरला परत येण्यासाठी निघणार होती. तेवढ्यात मला पार्ट टाइम कामावरुन काढले असल्याचे सांगण्यात आले. त्या क्षणी काय करावे हे मला समजत नव्हते. घराचे भाडे कसे देऊ,कपडे कसे खरेदी करणार असे बरेच काही प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले होते. त्यामुळे मी पुन्हा घरी परतण्याचे ठरवले होते. परंतु लॉकडाऊन सुरु झाला होता. माझी परिस्थिती पाहून जॉर्जने मला काही दिवस राहण्यासाठी विचारले.

- Advertisement -

जॉर्जने मला राहण्यासाठी सांगितल्यावर मला थोडी भिती वाटली कारण मी पुर्वी त्याच्यासोबत १ आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली नव्हती. परंतु मी त्याच्या २ रुमच्या छोट्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. जॉर्जने मला पैसे देऊ केले परंतु मी ते घेतले नाही कारण मला त्याच्यावर ओझे बनायचे नव्हते. तसेच मी विचारात पडले की आता घरातील कामे कशी करायची. परंतु मी या दिवसांचा फायदा घेण्याचे ठरवले आणि जॉर्जची परीक्षा घेण्याचेही ठरवले. मी जॉर्जला म्हणाले की, पदवी परीक्षा शिक्षण पुर्ण करण्यासाठी इथेच राहणार आहे. तसेच यानंतर जॉर्जसोबत राहण्याचा निर्णय घेईल.

तरुणीने ठरवले की आपल्या जोडीदार निवडीचा निर्णय बरोबर आहे की चूक हे तपासण्याचा हीच एक संधी असल्याचे तिने म्हटले आणि तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही घरातील कामे वाटून घेतली. प्रियकर जेवण बनवत होता. तर मी वेगळी कामे करत होती. कोरोना संकट असल्यामुळे मला घरातल्यांची चिंता वाटत होती. पंरतु जॉर्जने मला खुप समजून घेतले. छोटे-मोठे भांडण झाले. दोघांनी ११ महिने घालवल्यानंतर त्याला सोडण्याचा विचारही करु शकत नव्हती. त्याच्यासोबत राहून मी माझे शिक्षण पुर्ण केले तसेच जॉर्जचे प्रोबेशनही पुर्ण झाले होते. त्यामुळे जॉर्ज सोबत राहण्याचा निर्णय योग्य असल्याचे या तरुणीने म्हटले आहे.

- Advertisement -