घरताज्या घडामोडीकोमट पाणी पिण्याचे शरीरावर होतात 'हे' फायदे

कोमट पाणी पिण्याचे शरीरावर होतात ‘हे’ फायदे

Subscribe

जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे

सध्या कोरोनाच्या काळात सगळे जण कोमट पाणी पित आहे. तापवल्यानंतर पाण्याची चव बदलते या कारणामुळे अनेकजण कोमट पाणी पिण्याचे टाळतात. पण दिवसातून किमान तीन वेळा तरी कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आजारांपासून दूर राहता येत. त्यामुळे आज आपण कोमट पाणी पिण्याचे शरीरावर काय चांगले फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

सर्दी-खोकल्याच्या त्रास कमी होण्यास मदत होते

- Advertisement -

सध्याच्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होताना दिसत आहे. याच्यावर कोमट पाणी रामबाण उपाय आहे. नियमित कोमट पाणी प्यायल्याने घशात आणि नाकातील कफ बाहेर पडल्यास मदत होते. तसेच घशात होणारे कुठलेही संक्रमण कोमट पाण्यामुळे होत नाही.

वजन कमी होते

- Advertisement -

अनेकानेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. पण कोमट पाणी प्यायल्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून तीन महिने प्यायल्याने देखील परिणाम दिसून येतो.

केसांच्या समस्या दूर होतात

कोमट पाणी पिणे केस आणि त्वचेसाठीही लाभदायक आहे. कोमट पाणी प्यायल्याने केस गळणे, केस कोरडे आणि निस्तेज दिसणे, केसात कोंडा होणे अशा समस्या दूर होतात. त्यामुळे केस चमकादार होऊन त्यांची वाढही होते.

पोटाच्या समस्यापासून मुक्तता होते

रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्याने तुमचा बद्धकोष्ठता आणि अॅसिडीटीचा त्रास कमी होता. तसेच कोमट पाण्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. त्यामुळे पोटाच्या समस्यापासून मुक्तता होते.

सुरकुत्या कमी होतात

वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतात. त्यामुळे चिंता होत असते. पण कोमट पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवणे शक्य होते. नियमित कोमट पाणी प्यायलाने तुम्हाला काही आठवड्यातच त्याचा परिणाम दिसून येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -