घरक्रीडाथुंकीला पर्याय कॉटनच्या टॉवेलचा!

थुंकीला पर्याय कॉटनच्या टॉवेलचा!

Subscribe

चेंडूला तकाकी आणण्यासाठी नवा पर्याय

करोनाचा धोका उद्भवू नये म्हणून आयसीसीने पुन्हा क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातली आहे. सध्या क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ बनत आहे अशी वारंवार टीका होत असते. त्यातच आता थुंकीच्या वापरावर बंदी घातल्याने गोलंदाजांचे काम अधिकच अवघड होणार आहे, असे आजी-माजी क्रिकेटपटूंना वाटत आहे. गोलंदाजांना आता चेंडू चमकवण्यासाठी घाम हा केवळ एकमेव पर्याय उपलब्ध आहे. परंतु, याव्यतिरिक्त गोलंदाजांसाठी कॉटनचा टॉवेलही उपयुक्त ठरू शकतो, असे इंग्लंडमधील चेंडू बनवणार्‍या प्रमुख कंपनीला वाटते.

इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांत ड्युक्सचा चेंडू वापरतात आणि हा चेंडू ‘ब्रिटिश क्रिकेट बॉल्स लिमिटेड’ ही कंपनी तयार करते. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिलिप जाजोदिया यांनी चेंडूला तकाकी आणण्यासाठी आणखी एक पर्याय सुचवला आहे. चेंडू हा सर्वात आधी योग्यरितीने बनवलेला असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही थुंकी किंवा घाम किंवा इतर गोष्टींचा वापर करून त्याला तकाकी आणू शकता. आमच्या चेंडूची सीम हाताने शिवून बनवलेली असते. त्यामुळे तुमच्याकडे शैली आणि क्षमता असल्यास तुम्ही हा चेंडू स्विंग करू शकता. आयसीसीने घामाचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे गोलंदाजांना घाबरण्याचे कारण नाही. चेंडू चमकवण्यासाठी कॉटनचा टॉवेलही उपयुक्त ठरू शकतो. वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज माल्कम मार्शल नेहमी स्वतःकडे टॉवेल ठेवायचे, असे जाजोदिया म्हणाले.

- Advertisement -

इंग्लंडचा कर्णधार जो रुट आपल्या पॉलिस्टरच्या जर्सीला घासून चेंडू चमकवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, या घर्षणाचा काहीच उपयोग नाही. त्याची मेहनत वाया जाते. चेंडूला तकाकी आणण्यासाठी केवळ घाम आणि कॉटनचा टॉवेल उपयोगी आहे. त्यामुळे गोलंदाजांनी स्वतःजवळ कॉटनचा टॉवेल ठेवावा असा माझा सल्ला आहे, असेही जाजोदिया यांनी सांगितले.

फलंदाजांना फायदा नाही – चॅपल

- Advertisement -

चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातल्याने गोलंदाजांचे काम अवघड होणार असून याचा फलंदाजांना फायदा होणार आहे असे म्हटले जात आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल या मताशी सहमत नाहीत. फलंदाजांना फायदा झाला असे म्हणता येणार नाही. थुंकीच्या वापरावर बंदी घातल्याने गोलंदाजांचे काम खूपच अवघड झाले आहे असे नाही. चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीइतकाच घामही उपयुक्त ठरतो. त्यामुळे या बंदीने फार मोठा फरक पडणार नाही. गोलंदाजांना चेंडू केवळ थोडासा चमकवायचा असतो आणि हे घामाचा वापर करुनही करता येते, असे चॅपल म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -