घरलाईफस्टाईलपावसात हरड खाल्ल्यानं होतात 'हे' फायदे

पावसात हरड खाल्ल्यानं होतात ‘हे’ फायदे

Subscribe

इन्फेक्शन, ताप, सर्दी - खोकला असे साधे - साधे आजार न होण्यासाठी आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो. त्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात 'हरड' या औषधी वनस्पतीचा खूपच फायदा होतो. याबद्दलच जाणून घेऊया

पावसाळ्यात सर्वात जास्त आजार होतात. या आजारांपासून वाचण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. घरच्या घरीदेखील अनेक उपचार केले जातात. इतर आजारांसह पावसाळ्यात जास्त आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळं हे आजार होऊ नयेत यासाठी आधीपासूनच काळजी घ्यायला हवी. घरच्या घरी काही उपाय करून आजारांना रोखता येऊ शकतं. इन्फेक्शन, ताप, सर्दी – खोकला असे साधे – साधे आजार न होण्यासाठी आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो. त्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात ‘हरड’ या औषधी वनस्पतीचा खूपच फायदा होतो. याबद्दलच जाणून घेऊया.

हरड्याचा उपयोग – आयुर्वेदात हरड या वनस्पतीचा महत्त्वाचा उपयोग आहे. हे केवळ शरीरारसाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठीदेखील उपयोगी आहे. छोट्याशा हरडीचे खूपच मोठे फायदे आहेत. हरड ही अशी वनस्पती आहे ज्यामुळं पावसाळ्यात होणाऱ्या आजारापासून दूर राहता येते.

- Advertisement -

अॅलर्जीसाठी गुणकारी – त्वचेच्या बाबतीत कोणती अॅलर्जी असल्यास, हरडीचा काढा करून प्यावा. हरडचे फळ पाण्यात उकळून त्याचा काढा बनवावा आणि दिवसातून दोन वेळा नियमित घ्यावा. त्यामुळं त्वरीत आराम मिळतो. शरीराच्या एखाद्या भागावर अॅलर्जी झाली असल्यास, या काढ्यानं तो भाग धुतल्यासदेखील त्याचा परिणाम दिसून येतो.

इन्फेक्शन नाही होत – पावसाळ्यात त्वचेवर होणारं फंगल इन्फेक्शन ही नेहमीची बाब आहे. यावर हरडीचं फळ आणि हळदीच्या मिश्रणानं तयार करण्यात आलेला लेप दोन वेळा लावल्यास, हे फंगल इन्फेक्शन निघण्यास याचा उपयोग होतो. त्वचेवरील पूर्ण फंगस निघेपर्यंत या लेप रोज लावावा. या लेपचा चांगला उपयोग होतो.

- Advertisement -

उलटी अथवा सूज असल्यास फायदा हरड आणि मध एकत्र खाल्ल्यास उलट्या होणं बंद होतं. तसंच तोंडाला सूज आली असल्यास, हरडच्या पाण्यानं गुळण्या केल्यास फायदा होतो. हरडचा लेप ताकासह मिसळून गुळण्या केल्यास, हिरड्यांना सूज असल्यास, आराम मिळतो.

बद्धकोष्ठतेपासून आराम हरडमध्ये गॅलिक अॅसिडचा अंश असतो जो कॉलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतो आणि रक्तामधील इन्शुलिन वाढवण्यास याचा फायदा होतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी हरडच्या रसमध्ये चिमूटभर मीठ घालून खावे अथवा लवंग वा दालचिनीसह खावे.

वजन कमी करण्यास मदत – अधिकतर आजार बरे करण्याची क्षमता हरडमध्ये असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं याला हरीतकी असंही म्हणतात. हरडमुळं पचनतंत्र सुधारतं. तर शरीरातील डिटॉक्स कमी करून वजन कमी करण्यासदेखील हरडमुळं मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -