घरताज्या घडामोडीयशस्वी रिलेशनशिपची सूत्रे

यशस्वी रिलेशनशिपची सूत्रे

Subscribe

रिलेशनशिप निभावणे काही जादूचे काम नाही आहे. अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमुळे कपल्समध्ये दुरावा निर्माण होत असतो. रिलेशनशिप जबाबदारीने आणि खूप प्रयत्न करून निभावले जाते. रिलेशनशिप टिकवण्यासाठी प्रत्येक कपल्सने ही ५ सूत्रे अवलंबली पाहिजेत. ही ५ सूत्रे नेमकी काय आहेत ते जाणून घ्या.

एकमेकांना हसवत राहा

- Advertisement -

एकमेकांशी मोकळेपणाने हसत राहा कारण हसण्यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन तयार होतात. ज्यामुळे मूड चांगला राहतो. नेहमी मोकळेपणाने हसणारे कपल एकत्र खूप आनंदी असतात. हे कपल हसत हसत अनेक येणार अडचणींचा सहज सामना करतात. जर तुम्हाला ही रिलेशनशिप यशस्वी करायचे असेल तर एकमेकांना हसवत राहा.

एकमेकांबद्दल वाईट भावना ठेवू नका

- Advertisement -

जे कपल नेहमी आनंदी राहतात ते एकमेकांबद्दल वाईट भावना ठेवत नाही. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये छोट-छोटी भांडण होत असतात. पण झोपण्यापूर्वी आपल्या मनात असलेल्या शंका, प्रश्न एकमेकांशी बोलून सोडवा. जेणेकरून पुढच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. आपल्या मनात असलेल्या भावना एकमेकांसमोर खुल्या मनाने मांडा जेणेकरून तुमचा पार्टनर पुढच्यावेळेपासून त्या गोष्टींची काळजी घेईल.

सिक्रेट्स ठेवू नका

काही गोष्टी सिक्रेट ठेवल्यामुळे ते रिलेशनशिपला हानिकारक ठरू शकते. विशेषतः काही अशा गोष्टी तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितल्या नसतील आणि त्या दुसऱ्या व्यक्तीकडून कळतात. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत आहे अशा गोष्टी तुम्ही पार्टनर सोबत निसंकोचपणे बोला त्याच्यावर चर्चा करा. जर तुम्ही एकमेकांना समजूत घेत असाल तर तुमचा पार्टनर देखील या गोष्टी समजून घेईल.

पार्टनरला बोलण्याची संधी द्या

आपल्या गोष्टी मोकळेपणाने सांगाव्यात अशी प्रत्येकांची इच्छा असते. आपल्या पार्टनरला त्यांचे मत मांडण्यासाठी पूर्ण संधी द्या आणि ते बोलत असताना व्यत्यय आणू नका. उगाच मध्येच बोलू नका. यशस्वी रिलेशनशिपची हिच ओळख असते. पार्टनर कळते असते की, समोर व्यक्ती बोलत असताना कधी बोलू नये कधी बोलावे. पार्टनर बोलत असताना मध्येच बोलल्याने समस्या दूर होत नाहीत आणि रिलेशनशिपमध्ये कटुता येते.

एकमेकांना स्पेस द्या

रिलेशनशिप यशस्वी करण्यासाठी एकमेकांना स्पेस द्या. पार्टनरला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ द्या. एकमेकांची मत सारखी असली पाहिजे असे काही आवश्यक नसते. एकमेकांच्या मतांचा आदर करा. यामुळे आपण आपले विचार एकमेकांसमोर खुलेपणाने व्यक्त करू शकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -