झटपट बनवा कोबीच्या पौष्टीक वड्या

कोथिंबीर वडी अळू वडी आपण नेहमीच खातो. पण आज आपण बाजारात बाराही महिने उपलब्ध असलेल्या कोबीच्या वड्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहीत्य-अडीच कप बारीक चिरलेला कोबी
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
एक कप बेसन
एक चमचा लाल मिरची पावडर
२ चमचे जिरे पूड
२ चमचे धने पूड
२ चमचे गरम मसाला
चार चमचे तीळ
तळण्यासाठी तेल
चवीनुसार मीठ
प्रमाणानुसार पाणी

कृती- एका पसरट भांड्यामध्ये कोबी घ्या. त्यात चिरलेली कोथिंबीर, बेसन, मसाले मीठ आणि सर्व जिन्नस पाणी टाकून त्याचा एकजीव गोळा करा. गोळा हाताला चिकटत असेल तर त्यावर थोडे तेल लावा. त्यानंतर त्याचे रोल करा. त्यावर तीळ पेरा. स्टीमरमध्ये पाणी घालून त्यावर ही प्लेट ठेवा. पंधरा मिनट उकडवून घ्या. त्यानंतर रोल थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापा. गरम तेलात फ्राय करा. हिरव्या चटणीबरोबर या वड्या टेस्टी लागतात.