Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Corona Virus: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये का वाढत आहे हार्ट अटॅकचा धोका? अभ्यासकांनी...

Corona Virus: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये का वाढत आहे हार्ट अटॅकचा धोका? अभ्यासकांनी सांगितले कारण

कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना सतत हार्ट रेट मोजण्याचा सल्ला

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नवीन प्रकार समोर येत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या लाटेतील ८० टक्के लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाहीय. डॉक्टरांशी फोनवर चर्चा करुन ते घरीच उपचार घेऊ शकतात. मात्र आता कोरोना रुग्णांमध्ये हार्ट अटॅकचा धोका असल्याचे समोर आले आहे. ऑक्सफर्डच्या एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, कोरोना संक्रमण झालेले रुग्ण बरे झाल्यानंतर ५० टक्के रुग्णांना एका महिन्यानंतर ह्रदयासंबंधीत व्याधी जाणलत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना सतत हार्ट रेट मोजण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये हार्ट अटॅकचा धोका का संभोवतो? जाणून घ्या.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना संक्रमणामुळे शरीरात इंफ्लेमेशन ट्रिगर होते. त्याचबरोबर ह्रदयाच्या मांसपेशीही कमजोर होतात. त्यामुळे ह्रदयाच्या ठोक्यांची गती कमी होते. त्याचबरोबर रक्तांच्या गुठळ्याही तयार होण्याची शक्यता निर्माण होते. ज्यावेळी ह्रदयातीस मांसपेशी रक्त आवश्यकतेनुसार पंप करु शकत नाही अशावेळी रक्तवाहिन्या आणि उच्च रक्तदाबामुळे ह्रदय कमजोर होते. ही समस्येवर जर त्वरित उपचार मिळाले नाही तर ह्रदय रोगाचा धोका निर्माण होतो.

- Advertisement -

कोरोना व्हायरसने जर ह्रदयाच्या मांसपेशीवर हल्ला केला असेल तर त्यावर वेळीच उपचार करता येतील. त्यामुळे कोरोना संसर्ग होऊन गेल्यानंतर किंवा आधीपासूनच ह्रदयाशी संबंधित काही आजार असतील तर त्यांनी ह्रदयाची योग्यवेळी तपासणी करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.


हेही वाचा – CT Scan म्हणजे काय? कोरोना काळात सर्वाधिक वापर का केला जातोय?

- Advertisement -