घरलाईफस्टाईलजाणून घ्या पाणी कसं आणि कधी प्यावं

जाणून घ्या पाणी कसं आणि कधी प्यावं

Subscribe

बऱ्याचदा उत्तम आरोग्य राहण्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच दिवसाला ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे, असे देखील सांगितले जाते. मात्र, पाणी कसं आणि कधी प्यावे असा अनेकांना प्रश्न पडतो. कारण अनेक जणांची पाणी पिण्याची पद्धत, वेळ अतिशय चुकीची असते, ज्याने शरीराला नुकसान होऊ शकते.

  • पाणी कधीही एका घोटात किंवा एका श्वासात पिऊ नये. कारण पाणी पिताना लाळ पाण्यासह मिसळून शरीरात जाते.
  • लाळ आपली पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते.
  • पाणी पिताना सरळ बा़टलीने न पिता ग्लासमधून प्यावे.
  • आजारी असल्यास अधिक पाणी प्यावे.
  • सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी पिणे, फायदेशीर ठरते.
  • जेवणापूर्वी जवळपास अर्धा तास आधी पाणी प्यावे. त्यामुळे जेवण सहजपणे पचण्यास मदत होते.
    तसेच जेवणानंतर अर्धा तासापर्यंत पाणी पिऊ नये.
  • झोपण्यापूर्वी पाणी प्यावे. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते.
  • व्यायाम करण्यापूर्वी आणि व्यायाम केल्यानंतर एक ग्लास पाणी पिण्याने डिहायड्रेशनची समस्या कमी होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -