तुम्हीही भूक नसताना खाता का?

बऱ्याचदा पाहिले जाते की आपल्या खाण्यावर आपले नियंत्रण नसते. जास्त प्रमाणात खाण्याची प्रवृत्तीचे आपण होतो. पण त्यामागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? शास्त्रज्ञांनी या मागचे कारण शोधले आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की, आपल्या भूकचे पाच प्रकार असतात, जे सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करतात. आपल्याला खाण्यातून विशिष्ट प्रमाणात पोषक अन्न मिळते. आपल्या शरीराला कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी या पोषक तत्वांची आवश्यकता असते.

शास्त्रज्ञ ‘डेव्हिड रौबेनहाइमर’ आणि ‘स्टीफन सिम्पसन’ हे ३० वर्षांपासून प्राण्यांच्या वर्तनावर काम करत आहेत, त्यांनी माणसांच्या आहारावर देखील महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांनी केलेला अभ्यास हा ‘प्लस वन’ जनरलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यांनी वानरांना दिलेल्या आहाराचा तीस दिवस अभ्यास केला. त्यांना दररोज दिल्या जाणाऱ्या अन्नात विविधता होती. त्यात प्रथिने ते चरबी आणि कर्बोदकांमधे संतुलित प्रमाण होते.

‘डेव्हिड रौबेनहायमर’ आणि ‘स्टीफन सिम्पसन’ यांनी मनुष्य जातीवर हा प्रयोग केला. यासाठी दहा स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. ते दोन गटात विभागले गेले. बुफे सिस्टीम दरम्यान पहिल्या गटाला उच्च प्रथिनेयुक्त आहार देण्यात आला आणि दुसऱ्याला कमी प्रथिने, उच्च कार्बोहायड्रेट, उच्च चरबीयुक्त आहार दोन दिवसांसाठी देण्यात आला.

जनरल मध्ये प्रकाशित झालेल्या निकालांमध्ये असे दिसून आले आहे, की कमी प्रथिने असलेले अन्न खाण्याऱ्या लोकांनी जास्त कॅलरीयुक्त आहार घेतला. याचे कारण त्याच्या शरीरात नसलेले प्रथिने होते. तर उच्च प्रथिनेयुक्त आहार घेणाऱ्यांनी संतुलन राखण्यासाठी त्यांचे सेवन कमी केले.

रौबेनहायमर आणि सिम्पसन म्हणतात, उपासमार करणे एक शक्तिशाली उपाय म्हणून विचार करणे चूक आहे. विविध पोषक घटकांचा मागोवा ठेवण्यासाठी आपल्या भूक लागते. आणि म्हणून संतुलित आहार तयार करणे आवश्यक आहे.