घरलाईफस्टाईलरात्री उशिरा जंकफूड खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी कामावर होतो परिणाम?

रात्री उशिरा जंकफूड खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी कामावर होतो परिणाम?

Subscribe

प्रत्येक दिवशी काम करण्यापूर्वी त्यांना हे प्रश्न विचारण्यात आले आणि त्यातून त्यांची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी आहे याचा अभ्यास करण्यात आला. 

सध्याची परिस्थिती पाहता सर्वांचीच जिवनशैली संपूर्णपणे बदलली आहे. खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या संपूर्ण वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या कामावर होताना दिसत आहे. बऱ्याच जणांना रात्री उशिरा भूक लागते. भूक लागल्यावर बरेच जण जंक फूडचे सेवन करतात. मात्र रात्री उशिरा जंक फूड खाल्ल्याने त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

जर्नल ऑफ अपलाईड सायकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, चांगले आणि हेल्दी खाल्ल्याने त्याचा चांगला परिणाम आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या वागण्यावर आणि आपल्या कामावरही होतो. त्याचप्रमाणे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप आणि योग्य व्यायामही गरजेचा आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे. या गोष्टी योग्य असतील तर आपल्या अनहेल्दी खाण्याचा आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही.

- Advertisement -

या अभ्यासात प्रामुख्याने दोन प्रश्न विचारण्यात आले, जर अनहेल्दी खाण्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्या कामावर त्याचा परिणाम होतो का? आणि होत असेल तर का ?, असे प्रश्न अमेरिकेच्या लोकांना विचारण्यात आले. प्रत्येक दिवशी काम करण्यापूर्वी त्यांना हे प्रश्न विचारण्यात आले आणि त्यातून त्यांची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी आहे याचा अभ्यास करण्यात आला.

रात्री उशिरा जंक फुड खाण्याचे परिणाम

आपण बऱ्याचदा रात्री भूक लागल्यावर तेलकट जंकफूड खातो. मात्र त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रात्री उशिरा खाल्ल्याने जास्त प्रमाणात कॅलरीज शरीरात जातात. रात्री उशिरा खाल्ल्याने त्याचे पचन होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे झोपही येत नाही. त्यामुळे आपल्या झोपेची वेळ बिघडते. योग्य झोप न झाल्याने दुसऱ्या दिवशी त्याचा आपल्या कामावर आणि शरीरावर विपरित परिणाम होतो.


हेही वाचा – रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात निवड करा ‘आठ’ खाद्यपदार्थांची
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -