घरलाईफस्टाईल'कडुलिंब' एक अनमोल वृक्ष

‘कडुलिंब’ एक अनमोल वृक्ष

Subscribe

कडुलिंब या झाडाची मुळे, खोड, खोडाची साल, डिंक, पान, फुले, फळे, प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. त्यामुळेच त्याला एक वृक्ष औषधालय असे म्हणतात. कडुलिंबाच्या प्रत्येक गोष्टीचा वापर करण्यात येतो त्यामुळे कडुलिंब हे आरोग्यासाठी लाभदायक आहे.

  • कडुलिंबाची पाने, काड्या वाटून त्याचा रस प्यायल्याने उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होत नाही.
  • अंगाला खास सुटत असल्यास आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून आंघोळ करावी. यामुळे खाज कमी होते.
  • जंताचा त्रास असल्यास कडुलिंबाच्या एक चमचा रसात थोडा गूळ घालून तीन दिवस प्यायल्यास जंत बाहेर पडतात.
  • सांधेदुखीच्या त्रासासाठी कडुलिंबाचे तेल गुणकारी आहे. त्याने आराम मिळतो.
  • सर्दी-खोकला झाला असेल तर कडुलिंबाची पान मधात मिसळून चाटण घ्यावे. गळ्यातील खवखव कमी होते.
  • मधुमेही रुग्णांनी दररोज अर्धा कप कडुलिंबाचा रस प्यायल्याने त्यांचा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
  • केसांची वाढ होण्यासाठी कडुलिंबाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळावीत. नंतर गाळून ते तेल एका
  • बाटलीत ठेवावे. हे तेल नियमित लावल्याने केसांची वाढ चांगली होते. एखाद्या जखमेवर कडुलिंबाची पाने वाटून त्याचा लेप लावल्यास जखम लवकर भरते.
  • कडुलिंबाची पाने बारीक करुन दही आणि मुलतानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावरील डाग काही दिवसांतच नाहीसे होतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -