Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Health Tips: कोरोनात व्हिटॅमिन 'डी' कमतरतेचा धोका काय? वाढीसाठी काय कराल ?

Health Tips: कोरोनात व्हिटॅमिन ‘डी’ कमतरतेचा धोका काय? वाढीसाठी काय कराल ?

खाद्य पदार्थापासून सुद्धा विटामीन ड मिळू शकते मच्छी,अंड्याचा बलक ,दही,संत्री, दूध यामध्ये विटामीन ड भरपूर प्रमाणात आढळून येते.

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. अनेक देशांमध्ये परत एकदा लॉक डाऊन लावण्याची वेळ आली आहे. भारतामध्येही अनेक राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला जरी सुरवात झाली असली तरी कोरोना व्हायरसची लाट झपाटयाने पसरत आहे. कोरोना पासून बचावाकरिता डॉक्टर्स अनेक गोळ्या औषध,व्यायाम,प्राणायाम करण्याचे सल्ले देत आहेत. तसेच अनेकदा डॉक्टर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी शरीरात विटामीन भरपूर प्रमाणात असणे गरजेचे आहे असे वेळोवेळी सांगतात. यासाठी ते सकाळच्या कोवळ्या उन्हात बसण्याचे,चालण्यासाठी आवर्जून सांगतात. पण कोवळ्या उन्हाचे आपल्या शरीराकरिता काय फायदे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. विटामीन हे आपल्या शरीरातील महत्वाचे घटक आहे . याशिवाय आपले शरीर योग्यप्रकारे काम करू शकत नाही. पण लॉक डाऊन मुळे अनेक लोकांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. यामुळे शरीरात विटामीन ड ची कमतरता आढाळ्याचे दिसत आहे.

- Advertisement -

‘विटामीन ड’ म्हणजे काय ?

विटामीन ड हे एक संप्रेरक (harmone) असून ते शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्यात त्याची मोलाची भूमिका असते. शरीराला ड विटामीनचा प्रत्यक्ष उपयोग करून घेता येत नाही तर त्यासाठी त्याच्या क्रियाशील घटकाची आवश्यकता असते. ड-विटामीन किंवा काॅलिकॅल्सिफेरॉल हा शरीरातील काही महत्त्वाची कार्ये पार पाडण्यासाठी शरीराला आवश्यक असणारा घटक आहे.विटामीनचे पाण्यात विद्राव्य आणि मेदात विद्राव्य असे दोन प्रकार असतात. त्यापैकी ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वांत समावेश होतो. जर्मन रसायनशास्त्रज्ञ अडॉल्फ विंडौस यांनी १९२०मध्ये ‘ड’ विटामीनचा शोध लावला. सूर्यप्रकाश, मूत्रपिंड आणि यकृताच्या एकत्रित समन्वयाने तयार होणारे हे एकमेव विटामीनआहे.

- Advertisement -


‘विटामीन ड’ चे महत्व – सध्याच्या धावपळीच्या काळात विटामीन ची कमतरता प्रत्येक व्यक्तिमध्ये आढळून येते. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालू राहावे तसेच शरीराची रोग्प्र्तिकर शक्ती चांगली राहावी यासाठी विटामीन ड चे अत्यधिक महत्व आहे. रक्तात कॅल्शियमचे केंद्रीकरण होण्यास ते मदत करते. शरीरातील अनेक कार्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वपूर्ण आहे. हाडांच्या विकासातही त्याची महत्त्वाची भूमिका आहे.

विटामीन ड चे नैसर्गिक स्त्रोत- सूर्य हा विटामीन ड चा नैसर्गिक स्त्रोत मनाला जातो. सकाळच्या कोवळ्या उन्हात दररोज 15 ते 20 मिंनट बसल्याने शरीरातील विटामीन ड ची कमतरता दूर होईल. तसेच अनेक खाद्य पदार्थापासून सुद्धा विटामीन ड मिळू शकते मच्छी,अंड्याचा बलक ,दही,संत्री, दूध यामध्ये विटामीन ड भरपूर प्रमाणात आढळून येते.

Vitamin D

‘विटामीन ड’ ची  कमतरता – विटामीन ड च्या कमतरतेमुळे कोलन कॅन्सर,प्रोस्टेड कॅन्सर,ब्रेस्ट कॅन्सर, हृदयरोग, डिप्रेशन,स्थूलपणा सारखे संभाव्य आजार होऊ शकतात. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉक डाऊन असून अनेक लोक घराबाहेर पडत नसल्यामुळे त्यांच्यात विटामीन ड च्या कमतरतेमुळे हाडांच्या समस्येला,डिप्रेशनला तसेच न्युरोलॉजिकल समसेयला सामोरे जावे लागत आहे.

त्वचेच्या सौंदर्याकरिता गाजर, बीट, अ- जीवनसत्त असणारे पदार्थांचे सेवन करा

‘विटामीन ड’ च्या  कमतरतेची लक्षणे– थकवा,शरीर दुखणे,लचक भरणे , हाडांचे दुखणे,कमजोरी वाटणे,सीडी चढण्यास किंवा उतरण्यास त्रास होणे,मळमळणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठ यासारखी लक्षणे प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतात


हे हि वाचा – Coronavirus : कोरोनाला दूर ठेवायचयं, तर दररोज दालचिनीचा चहा प्या

- Advertisement -