घरलाईफस्टाईलतारूण्यपिटीका कमी करण्यासाठी हर्बल उपाय

तारूण्यपिटीका कमी करण्यासाठी हर्बल उपाय

Subscribe

अनेक तरुण-तरुणी आपली त्वचा आणि चेहर्‍याची सुंदरता टिकून राहण्यासाठी चिंतीत असतात. पण किशोरावस्थेमध्ये होणार्‍या हार्मोल्स परिवर्तनामुळे चेहरा तसेच त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. यातील मुख्य समस्या म्हणजे चेहर्‍यावरील तारूण्यपिटीका म्हणजेच पिंपल्स. या समस्येपासून सुटका होण्यासाठी बाजारात आज अनेक प्रकारची क्रीम आणि औषधे उपलब्ध आहेत. पण याचा आपल्याला हवा असलेला फरक जाणवत नाही आणि मग चेहर्‍याचे सौंदर्य खराब होण्यास सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला काही निवडक हर्बल टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तारुण्यात होणारे त्वचेच्या समस्यांपासून मुक्तता मिळण्यास मदत होईल.

लिंबाने स्वच्छ करा चेहरा

चेहर्‍याची त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर लिंबाचा रस लावल्याने चेहर्‍यावरील रोमछिद्रे मोकळी होण्यास मदत होते. तसेच मृत कोशिका नष्ट होतात. चेहर्‍यावर लिंबाचा रस लावल्याने तेलकटपणा कमी होण्यासही मदत होते.

राजगिरा चहाचा फेशवॉश बनवून चेहर्‍यावर लावा

चौलाईच्या बीजांपासून तयार करण्यात आलेल्या चहाचा उपयोग फेसवॉशसारखा केला पाहिजे. हे तयार करण्यासाठी 3 कप पाणी उकळून त्यामध्ये चौलाईच्या बिया (2 चमचे) एकत्र करा. त्यावर साधारण 3 मिनिटे झाकण ठेवून पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तुळशीची 10 ताजी पाने टाकून 30 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. रात्री झोपण्याआधी हे पाणी फेसवॉशसारखे वापरू शकता. असे केल्याने चेहर्‍यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

धणे आणि ओव्याचे पाणी प्यावे

अर्धा चमचा ओव्याचे दाणे, धणे आणि बडीशेप 2 कप पाण्यामध्ये टाकून 10 मिनिटांसाठी हलक्या आचेवर उकळून घ्यावे. हे पाणी गाळून रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ प्यायल्याने चेहर्‍यावरील पिंपल्स कमी होतात.

तुळशीचा काढा

तुळशीची 15-20 ताजी पाने एक कप पाण्यात 10-15 मिनिटांसाठी हलक्या आचेवर ठेवून त्याचा काढा बनवावा. काढा थंड झाल्यानंतर रोज चेहर्‍यावर (पिंपल्स) आलेल्या ठिकाणी 4 ते 5 वेळेस लावल्याने आराम मिळतो.

- Advertisement -

चेहर्‍यावर लावा एलोव्हेरा

एलोव्हेराचे ताजे पान घेऊन ते सोलून घ्यावे. सोलल्यानंतर त्यामधून एक प्रकारचे जेल बाहेर येईल. 5 ग्रॅम जेल काढून त्यामध्ये 1 ग्रॅम बेसन आणि चिमूटभर हळद टाकून चेहर्‍यावर लावल्यास पिंपल्स कमी होतात.

काकडीचा रस

काकडी सोलून त्याचा रस तयार करून चेहर्‍यावर लावल्यास पिंपल्सच्या त्रासापासून आराम मिळतो. काकडीचा रस रोज 3-4 कप प्यायल्यानेदेखील फायदा होतो.

लिंबाचे पान लावावे

 लिंबाच्या एंटी-बॅक्टेरिअल, एंटी-फंगल आणि एंटी-वायरल गुण सर्वांना माहिती आहेत. रोज जर 5-10 ताजी कोवळी लिंबाची पाने चावून खाल्ल्यास त्वचा आणि रक्ताच्या अनेक आजारांवर नियंत्रण राहण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -