Monday, April 19, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल सावधान! अती प्रोटीनमुळे हृदय कमकुवत होऊ शकते

सावधान! अती प्रोटीनमुळे हृदय कमकुवत होऊ शकते

Related Story

- Advertisement -

पचनास जड असलेल्या प्रोटीनयुक्त आहारामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. खास करुन मध्यम वयातील पुरुषांच्या हृदयाच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरित परिणाम होतो, असे नुकतेच एका संशोधनानंतर लक्षात आले आहे. इस्टर्न फिनलँड या विद्यापीठीच्या संशोधनात ही बाब आढळून आली आहे. तर दुसरीकडे मासे आणि अंड्यांतील प्रोटीनचा हृदयाच्या कार्यक्षमतेवर काहीही परिणाम होत नसल्याचे देखील त्यांच्या संशोधनातून लक्षात आले आहे.

बरेच लोक हे हाय प्रोटीनयुक्त आहार घेत असतात. जसे की, चिकन, मटन हा सर्वांचा आवडता आहार असतो. त्यांनी हे नक्कीच लक्षात घ्यावे की, या हायप्रोटिनमुळे बऱ्याच अंशी हृदयाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत आहे. संशोधनातून असे लक्षात आले की, प्राण्यांपासून मिळणारे हाय प्रोटीन खाल्यामुळे अनेक जण डायबिटीज सारख्या आजाराला बळी पडत आहेत. तर काहीच्या हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे अक्षरश: मृत्यूमुखी देखील पडत आहेत.

- Advertisement -

हाय प्रोटीनयुक्त अन्न पदार्थ
चिकन, मटन, अंडे ,मासे, चीझ, बटर, दुध, दही

वनस्पतीजन्य प्रोटीनयुक्त अन्न पदार्थ
ड्रायफ्रुट्स, डाळी, कडधान्ये, भाज्या, ब्रोकली, ओट्स

- Advertisement -

इस्टर्न फिनलँड या विद्यापीठामार्फत ४२ ते ६० वर्षे वयोगटातील २,४४१ पुरुषांवर २२ वर्षे संशोधन करण्यात आले. यातील ७० टक्के पुरुषांनी प्राणीयुक्त प्रोटीन पदार्थांचे सेवन केले होते. तर २७.७ टक्के पुरुषांनी वनस्पतीयुक्त प्रोटीनचा आहार घेतला होता. यातील ३३४ केसेस मधील पुरुषांच्या हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालेला दिसून आला.
या संशोधनात एकंदरीत असे लक्षात आले की, ज्यांनी ज्यांनी पचनास जड असललेले प्राणीजन्य प्रोटीनयुक्त आहार घेतला त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त आढळून आला. (मासे व अंडी पासून मिळणारे प्रोटीन वगळता) वनस्पती जन्य प्रोटिनयुक्त आहार घेतलेल्यांना हा धोका मात्र कमी आढळून आला

- Advertisement -