घरलाईफस्टाईलइयरबड्सच्या मदतीने घरातील 'या' वस्तू करू शकता स्वच्छ

इयरबड्सच्या मदतीने घरातील ‘या’ वस्तू करू शकता स्वच्छ

Subscribe

घराची स्वच्छता करणे सोप्पे नव्हे. नेहमीच घराच्या लहान-लहान कोपऱ्यात धूळ जमा झालेली आपण पाहतो. अशातच तेथे झाडूचा वापर केला जाऊ शकत नाही. त्यामुळे ते स्वच्छ कसे करायचे असा प्रश्न पडतो.

वास्तविकरित्या असे करणे गरजेचे नाही. लहान ठिकाणच्या क्लिनिंगसाठी तुम्ही इअरबड्सचा वापर करू शकता. याला कॉटन स्वॅब असे सुद्धा म्हटले जाते. बहुतांश लोक याचा वापर कान स्वच्छ करण्यासाठी करतात. मात्र खरंतर घरातील काही लहान-लहान वस्तू सुद्धा याच्या माध्यमातून स्वच्छ करण्यास मदत होईल.

- Advertisement -

कंप्युटरचा की-बोर्ड स्वच्छ करा
आजच्या काळात कंप्युटर किंवा लॅपटॉप हा प्रत्येक घराची गरज झाला आहे. मात्र याच्या स्वच्छतेकडे बहुतांश लोक लक्ष देत नाहीत. वेळोवेळी स्वच्छ न केल्यास त्याच्या की-बोर्डमध्ये धूळ जमा होते. हिच धूळ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही इअरबड्सचा वापर करू शकता.

ज्वेलरी करु शकता स्वच्छ
अंगठी ते झुकमे सुद्धा तुम्ही इअरबड्सच्या मदतीने स्वच्छ करू शकता. मात्र इअरबड्सने स्वच्छता करताना काळजी जरूर घ्या.

- Advertisement -

लहान इलेक्ट्रिनिक्स प्रोड्क्ट्स करा स्वच्छ
कॅमेरा, गेम कंट्रोलर अथवा लहान स्पीकर सारखे लहान इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स स्वच्छ करणे खरंच कठीण काम असते. अशातच हे गॅजेट्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही इअरबड्सचा वापर करू शकता.

फर्निचरवरील डाग हटवा
जर फर्निचरवर एखादा डाग लागला असेल तर तो क्लिन करण्याासठी इअरबड्सचा वापर करू शकता. कापड किंवा फर्निचरच्या फॅब्रिकवर लागलेले डाग तुम्ही इअरबड्सच्या मदतीने क्लिनिंग सोल्यूशनचा वापर करून स्वच्छ करु शकता.


हेही वाचा- कुकरचा रबर सैल झाला असेल तर वापरा ‘या’ टिप्स

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -