घरलाईफस्टाईलघच्या घरी करा 'हे' उपचार

घच्या घरी करा ‘हे’ उपचार

Subscribe

घरच्या घरी छोट्या मोठ्या आजारांवर उपाय

सध्याचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. या धावपळीत अनेकांना काहींना काही छोटे मोठे आजार होत असतात. मात्र, प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे जाणे सोयीचे ठरत नाही. अशावेळी काही आजारांवर घरच्या घरी उपाय केल्यास त्या व्याधी दूर होण्यास मदत होते.

  • संडासला पातळ आणि चिकट होत असेल तर धण्याचा काढा करुन रोज दोन वेळेस घ्यावा. यामुळे आराम मिळतो.
  • शरीरावर चामखीळ आली असेल तर कोथिंबीरचा रस त्या ठिकाणी चोळावा म्हणजे थोड्याच दिवसात चामखीळ गळून पडतात.
  • धणे आणि जिरे रात्री गरम पाण्यात भिजत घालावे आणि सकाळी कुस्करुन ते पाणी गाळून प्यावे म्हणजे हाडातील ताप कमी होऊन हाडे दुखणे थांबते.
  • नाकातून रक्त येत असेल तर कोथिंबीरचा रस काढून तो नाकामध्ये थेंब थेंब टाकला असता नाकातून रक्त येणे बंद होते.
  • एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धणे एकत्र उकळून त्याचा काढा करावा आणि तो गाळून घेतला असता शरीरातील ताप, मूत्रदहा, आहारातून तयार झालेले विष कमी होते.
  • खोकला झाला असता धणे आणि ज्येष्ठमध यांचा काढा करुन घेतला असता खोकला लगेच कमी होईल.
  • नारळाच्या तेलात धणे उकळून ते तेल दुखणाऱ्या जागेवर लावले असता तेथील शिरा मोकळ्या होऊन वेदना कमी होतात.

    (टीप : वरील उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -