घरलाईफस्टाईलशरीरातील अँन्टीबॉडीज कोरोना विषाणूवर कशाप्रकारे मात करतात? लॉजिक वाचा

शरीरातील अँन्टीबॉडीज कोरोना विषाणूवर कशाप्रकारे मात करतात? लॉजिक वाचा

Subscribe

अँटीबॉडीज म्हणजे एक प्रकारचे प्रोटीन

कोरोना विषाणूपासून वाचायचे असेल तर आपल्या शरीरात कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी आवश्यक अँन्टीबॉडीज असणे गरजेचे आहे. मात्र माणसाच्या शरीरात या अँन्टीबॉडीज कशा तयार होतात हा प्रश्न सर्वांना पडतो. यावर अमेरिकेच्या संशोधकांनी अभ्यास केला आहे. त्यातून असे समोर आले आहे की, आपल्या शरीरात कोरोना संक्रमणाला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूला मारण्याचे काम अँन्टीबॉडीज करतात. अँटीबॉडीज हे शरीरातील एक तत्व आहे जे आपल्या शरीरात इम्युन सिस्टिम तयार करते. अँटीबॉडीज म्हणजे एक प्रकारचे प्रोटीन असते. जे आपल्या शरीरात व्हायरस जाण्यापासून रोखते. जेव्हा कोणताही व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या रक्तात आणि टिश्यूमध्ये असणारी अँटीबॉडीज तयार होतात. कोरोना संक्रमणात आलेल्या व्यक्तिच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. कधी कधी अँटीबॉडीज तयार होण्यास एका आडवड्याचा काळही लागतो. ज्यांच्या शरीरातील इम्युनिटी सिस्टिम मजबुत असते अशा शरीरात दोन आठवड्यात तयार झालेल्या अँटीबॉडीज एक वर्षांपर्यंत राहू शकतात. असे रुग्ण प्लाझ्मा ही दान करुन शकतात.

ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापिठाने कोरोनातून बऱ्या झालेल्या चार जणांवर अभ्यास केला. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा नमुन्यांचे त्यांचे विश्लेषण केले. त्यांत त्यांना असे आठळले की, बऱ्याच अँन्टीबॉडीज या रक्तात फिरत असतात. त्यातील ८४ टक्के अँन्टीबॉडीज या स्पाइक प्रोटीनच्या RBDभागात असतात. RBD हा प्रोटीनच्या सर्वात महत्त्वाचा भाग असतो. RBD हा स्पाइकचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो मानवी पेशींशी जोडलेला असतो. विषाणू त्यांना संक्रमित होण्यापासून सावधान करतो. यातून रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्याचे संपूर्ण काम स्पाइक पाहत असतात.

- Advertisement -

लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १५ दिवसात शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. लस कोरोना विषाणूवर पूर्णपणे प्रभावी नाही. लसीपासून तयार झालेल्या अँटीबॉडीज कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात, असे अभ्यासक सांगतात.


हेही वाचा – Corona Virus: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये का वाढत आहे हार्ट अटॅकचा धोका? अभ्यासकांनी सांगितले कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -