घरलाईफस्टाईलग्लोईंग त्वचेसाठी खा 'क' जीवनसत्त्व युक्त असलेली फळं

ग्लोईंग त्वचेसाठी खा ‘क’ जीवनसत्त्व युक्त असलेली फळं

Subscribe

विशेषतः क जीवनसत्व जास्त असतील अशा फळांचा समावेश करावा. यामुळे त्वचेचे सौंदर्य कायम राखण्यास मदत होते

आपली त्वचा चमकदार, ग्लोईंग असावी ही प्रत्येकाची आवड असते. सगळ्यांना असे वाटत असते की, आपली त्वचा कायम निस्तेज आणि सुंदर असावी. मात्र धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. यामुळे हिवाळा असो किंवा उन्हाळा या काळात त्वचेच्या अनेक समस्या जाणवतात. सामान्यतः ज्यांची त्वचा कोरडी किंवा शुष्क आहे त्यांना जास्त त्वचेच्या समस्या उद्भवतात. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी आपल्या आहारात क जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश कऱणे आवश्यक आहे. यामध्ये विशेषतः क जीवनसत्व जास्त असतील अशा फळांचा समावेश करावा. यामुळे त्वचेचे सौंदर्य कायम राखण्यास मदत होते.

- Advertisement -

साइट्रस फ्रूट

संत्र, मोसंबी आणि लिंबू यासारख्या फळांत जीवनसत्व क हे जास्त प्रमाणात असते. अशा फळांचा ज्यूस किंवा ती फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते. या फळांचा ज्यूस शक्यतो नैसर्गिक असेल तेवढे चांगले. कारण तयार फ्रुट ज्यूस पिल्याने हानिकारक असू शकते.

- Advertisement -

पपई

डोळ्यांच्या आणि पोटाच्या आरोग्यासाठी हेल्दी मानली जाणारी पपई या फळात व्हिटॅमिन सी भरपूर असतात. फक्त अर्धा कप पपईचा ज्यूस तुम्हाला दिवसभर आवश्यक असणारी एनर्जी देते. तसेच पपईचा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

टमाटा

लालबुंद दिसणारा हा टमाटा क जीवनसत्त्वाने परिपुर्ण असतो. टमाटा जेवण्यात शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाल्ले जाईल, हे अधिक आरोग्यदायी मानले जाते. कारण टमाटा शिजवून खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्व कमी होतात. त्यामुळे ते खाणे कमी फायदेशीर ठरते.
याच टमाट्याचा फेसपॅक लावल्यास चेहरा ग्लोईंग होण्यास मदत होते.

शिमला मिर्ची

आपल्या आहारातून शिमला मिर्चीचा जास्तीत जास्त वापर करावा. शिमला मिर्चीत देखील जीवनसत्व पुरेपूर असते.

ब्रॉकली

ब्रॉकली ही फळ भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये कॅल्शिअम, जीवनसत्व ब, आयर्न, फायबर, आणि जीवनसत्व क ने समाविष्ट आहे. ब्रॉकली शिजवून खाण्यापेक्षा कच्ची सॅलेडमधून खाल्यास उत्तम ठरते. आरोग्यासह त्वचेच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -