घरलाईफस्टाईलस्वयंपाक घरातील उपयुक्त सल्ले

स्वयंपाक घरातील उपयुक्त सल्ले

Subscribe

गृहिणींकरता महत्त्वाच्या टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • दोडक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखशीचे वाटण लावायचे, अगदी मस्तच लागते ही बंगाली पद्धतीची भाजी.
  • इडली-डोशाचे पीठ जर पीठ नियोजित वेळेआधी फर्मेंट झाले तर त्यात मीठ घालून ढवळून फ्रीजमध्ये ठेवावे.
  • साबुदाणे धुवून, त्यात साबुदाण्याच्या वर बोटा एवढे गरम पाणी घालून रात्रभर भिजवावेत किंवा निम्मे दूध, निम्मे पाणि घालून भिजवावेत.
  • लसूण गरम पाण्यात थोडा वेळ भिजवा साले लवकर सुटतात!
  • उकळतानां दुध घातल्यानंतर चहा उतु जाऊ नये, म्हणून त्यात गाळणं घालून ठेवावे. चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर जात नाही.
  • मुळव्याध असणाऱ्या व्यक्तींनी पांढरे तीळ कच्चे मिक्सरवर बारीक करुन १ मोठा चमचा दह्यात ही पूड घालून सकाळी उठल्यावर खाणे. ८ दिवसात बरे वाटते. आहार तिखट नसावा.
  • दम्यासाठी मुलांना पण चालेल असे औषध म्हणजे पिंपळाची वाळलेली साल कुटून वस्त्रगाळ करणे. कोजागिरीला शरदाच्या चांदण्यात दुधात १ मोठा चमचा ही पूड घालून ठेवणे. पहाटे हे दूध पिणे. बरे वाटते.
  • आठ दिवस सुरणाची भाजी खाल्याने मूळव्याध कायमची गायब होऊ शकते.
  • नवजात बालकांना जर गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाणी थोडे थोडे तोंडावाटे न देता पोटावर चोळत राहिले तरी आराम पडू शकतो.
  • साबुदाणे भिजवताना पाण्यात चार मोठे चमचे ताक आणि लागेल एवढे मीठ घालावे. खिचडी फोडणीला घातल्यानंतर पाच मिनिटांत तयार होते. गॅसजवळ उभे राहून दहा बारा वेळा ढवळले असता बघता बघता खिचडी फुलून येते. वेळेच्या आधी गॅस बंद करावा कारण गरम भांड्यात ती शिजतच असते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -