घरलाईफस्टाईलस्वयंपाकासाठी खास किचन टीप्स

स्वयंपाकासाठी खास किचन टीप्स

Subscribe

झटपट किचन टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणी सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

- Advertisement -
  • डोसे कुरकुरीत हवे असल्यास तांदूळ आणि उडीद डाळ चारास एक या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तिनास एक असे असावे.

  • तांदुळ शिजवतांना कुकर मध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो. त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.

  • बटाटे नेहमी सूर्यप्रकाश, पाणी, उष्णता यापासून दूर थंड जागेत ठेवावेत.

  • कुरकुरीत भजे बनविण्यासाठी भजाच्या मिश्रणात मक्याचे पीठ घालावे.
  • अनेकदा आपण आले सुकून जाऊ नये याकरता फ्रिझमध्ये ठेवतो. मात्र, तरी देखील ते खराब होते, अशावेळी आल्याला माती लावून ते सावलीत ठेवल्यास अधिक काळ चांगले राहण्यास मदत होते.

  • अनेकदा सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिण्यास सांगितले जाते. मात्र, ते लगेच शक्य होत नाही. अशावेळी सवडीने आल्याचा रस काढून त्याचा उरलेला चोथा ताटलीमध्ये थापून ताटली फ्रिजमध्ये झाकून ठेवा. सुकून झाल्यानंतर त्याने तुकडे पाडून बंद डब्यात ठेवून दया आणि हवे तेव्हा वडी काढून चहाच्या उकळत्या पाण्यात टाका, अशाप्रकारे झटपट आल्याचा चहा तयार.

  • अंडी उकडलेले पाणी कुंडीतील रोपांना घातल्यास झाडांना चांगले पोषक मिलण्यास मदत होते.

  • कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. यामुळे कॅल्शिअम अधिक प्रमाणात मिळण्यास मदत होते.

  • पेपर डोशाचे मिश्रण तयार करताना त्यामध्ये एक छोटा कांदा चिरुन टाकावा आणि अर्ध्या वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून ते मिश्रण पिठामध्ये टाका. यामुळे डोसे पातळ आणि कुरकुरीत बनण्यास मदत होते.

  • टमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन् काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेवी व ज्युस साठी करता येतो.

  • जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे, नारळ तेथूनच तुटेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -